'माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर गाठ माझ्याशी'- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 03:41 PM2020-02-21T15:41:57+5:302020-02-21T16:36:16+5:30

सुप्रिया सुळे यांच्या संवाद मेळाव्यात विधानसभा सभेच्या निवडणुकीत माजी आमदार संजय वाघचौरे यांचे तिकीट कापल्यावरुन त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला.

'... Beware of'; MP Supriya Sule slams participants and leaders during the Sanwad Melava | 'माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर गाठ माझ्याशी'- सुप्रिया सुळे

'माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर गाठ माझ्याशी'- सुप्रिया सुळे

googlenewsNext
ठळक मुद्दे'कुठल्या बापाची लेक आहे, हे समजून घ्या';सुप्रिया सुळे यांचा इशारा'माझ्या बापाने रक्ताचे पाणी करुन हा पक्ष वाढवला आहे''माझ्या बैठकीत पहिल्यांदा असा गोंधळ झाला असून ही बैठक माझ्यासाठी कायम कटू आठवणीत राहील.'

पैठण : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संवाद मेळाव्यात संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोरच बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी रक्ताचे पाणी करून उभारलेल्या पक्षाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराच कार्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांना दिला. 

येथील सुप्रिया सुळे यांच्या संवाद मेळाव्यात विधानसभा सभेच्या निवडणुकीत माजी आमदार संजय वाघचौरे यांचे तिकीट कापल्यावरुन त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी दत्ता गोर्डे यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली. हा गोंधळ वाढत जाऊन कार्यकर्त्यांनी मेळाव्यातच बाचाबाची केल्याने सुप्रिया सुळे यांनी मेळावा काही वेळातच आटोपता घेतला. मात्र या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत करताना कडक भाषेत समज दिली.

त्या म्हणाल्या, "माझ्या बापाने रक्ताचे पाणी करुन हा पक्ष वाढवला आहे. यांचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे...पक्षाला गालबोट लावणाऱ्याला माफ करणार नाही. ही हुल्लडबाजी मी पहिल्यांदा पाहिली आहे. हे मी खपवून घेणार नाही..मी कुठल्या बापाची लेक आहे, हे समजून घ्या. माझ्या बैठकीत पहील्यांदा असा गोंधळ झाला असून ही बैठक माझ्यासाठी कायम कटू आठवणीत राहील असा सनसनीत टोलाही यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या व त्यांना फूस लावणाऱ्या नेत्यांना लगावला.

Web Title: '... Beware of'; MP Supriya Sule slams participants and leaders during the Sanwad Melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.