आचार्य आर्यनंदी महाराज सभागृहाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:20 AM2017-10-26T00:20:21+5:302017-10-26T00:22:14+5:30
येथील १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात उभारण्यात येणाºया आचार्य आर्यनंदी मुनी महाराज यांच्या सभागृहाचे भूमिपूजन बाल ब्रम्हचारी सुनीता दिदी यांच्या सानिध्यात संपन्न झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात उभारण्यात येणाºया आचार्य आर्यनंदी मुनी महाराज यांच्या सभागृहाचे भूमिपूजन बाल ब्रम्हचारी सुनीता दिदी यांच्या सानिध्यात संपन्न झाले.
यावेळी सभागृहाच्या बांधकामास आ. तान्हाजी मुटकुळे यांनी पाच लाख रुपये निधी दिला. सभागृहाचे भूमिपूजन नरेंद्र चंद्रकांत दोडल यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास स्वरुपचंद परतवार, रत्नदिपक सावजी, राजकुमार बडजाते, प्रवीण झांजरी, कुलभूषण संघई, शरद सोवितकर, पवन बुर्से, मनोज बुर्से, केशवराव वरवंटे, रवि अलोने, उमेद सोवितकर, सुशील मरळे, अरविंद कंदी, प्रवीण कंदी, संतोष परतवार, अमोल संघई, चंद्रशेखर कान्हेड, दिलीप कान्हेड, दीपक परभणकर, प्रदीप दोडल, जीवन घोडके, प्रेमचंद जोगे, हेमा रवणे, शांताबाई महाजन, दिलीप संघई, उदय सोवितकर, शांतीलाल बडजाते आदी उपस्थित होते. सभागृहाच्या बांधकामासाठी सकल जैन समाजबांधवांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन वंदना सोवितकर, निलिमा वरवंटे, नारायणराव सोनटक्के यांनी केले.