पंढरपुरात भागवत कथा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:37 AM2017-12-26T00:37:40+5:302017-12-26T00:37:43+5:30

पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात जय माता दी भक्त परिवारातर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली होती.

 Bhagwat Katha Week in Pandharpur | पंढरपुरात भागवत कथा सप्ताह

पंढरपुरात भागवत कथा सप्ताह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात जय माता दी भक्त परिवारातर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली होती.
वाळूज एमआयडीसीतील जय माता दी भक्त परिवाराच्या वतीने दोन वर्षांपासून पंढरपुरातील वैष्णोदेवी उद्यानात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी सकाळी १० वाजता उत्तर प्रदेशचे कानपूर येथे आलेले पं.रामश्याम तिवारी, वैष्णोदेवी मंदिराचे विश्वस्त ओम प्रकाश गर्ग, डॉ.रामकुमार द्विवेदी, पुष्पलता द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून विविध, धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर काढण्यात आलेल्या कलश मिरवणुकीत डॉ.रामकुमार द्विवेदी यांनी भागवत ग्रंथ व पुष्पलता द्विवेदी यांनी डोक्यावर घेऊन कलश मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
या मंदिर परिसरात प्रदक्षिणा मारून शिव मंदिरात पूजा करून सप्ताहस्थळी कलश मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत २१ महिला भाविकांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता.
या मिरवणुकीनंतर दुपारी पंडित रामश्याम तिवारी यांनी उपस्थित भाविकांना भागवत कथेतून समाज प्रबोधन करताना म्हणाले की, ईश्वराच्या भक्तीत जीवनाचे खरे सुख आहे. मनात विश्वास असेल तरच कुठेही कार्य यशस्वी होते. या सप्ताहात पंडित रामश्याम तिवारी हे दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भागवत कथा वाचन करून समाज प्रबोधन करणार आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पूजा, हवन यज्ञ व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहेत.
या धार्मिक कार्यक्रमाचा वाळूज परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जय माता दी भक्त परिवारातर्फे डॉ.रामकुमार द्विवेदी, ओमप्रकाश गर्ग, सुनील सिंह, रिता सिंहल मनोजकुमार तिवारी, प्रतिभा तिवारी, सरोजकुमार तिवारी, अनिल मिश्रा, वंदना मिश्रा, राजेंद्र पटेल, पूनम पटेल, दीपक गर्ग, राकेश पांडे, कमलेश दुबे, हिरेंद्र शर्मा, विवेक पाठक, विजेंदर सिंह, जगदीश सोळंकी, यश सोळंकी, ज्योती स्वरूप मित्तल, सुरेंद्र सिंह, प्रमोद तिवारी, राजेश पांडे आदींनी केले आहे.

Web Title:  Bhagwat Katha Week in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.