कर्णपुरा जैन मंदिरात भक्तिस्वरामृत

By Admin | Published: September 6, 2016 01:02 AM2016-09-06T01:02:35+5:302016-09-06T01:07:28+5:30

औरंगाबाद : ‘रूम, झुम करता पधारो म्हारो भैरूजी’, ‘ये मणिभद्र महाराणा,’ ‘झिनी झिनी उडरे गुलाल’ अशी गीते गाऊन संजय संचेती यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.

Bhaktiswaramrit in Karnapura Jain temple | कर्णपुरा जैन मंदिरात भक्तिस्वरामृत

कर्णपुरा जैन मंदिरात भक्तिस्वरामृत

googlenewsNext

औरंगाबाद : ‘रूम, झुम करता पधारो म्हारो भैरूजी’, ‘ये मणिभद्र महाराणा,’ ‘झिनी झिनी उडरे गुलाल’ अशी गीते गाऊन संजय संचेती यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.
पर्युषण पर्वानिमित्त आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर ट्रस्टच्या वतीने कर्णपुरा येथील मुनीसुव्रतनाथ जैन श्वेतांबर मंदिरात भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचेती यांनी ‘मिठो मिठो बोल कई बिगडे’, ‘पंनखिडा तू उडके जावा पावापुरी रे’, ‘कृपा कर दे कृपा कर दे मुनीसुव्रतनाथ कृपा कर दे’, ‘आया दादा तेरे नगरी मै हमको भी एक पल घुमाई दे प्रभू अपने डगरिया’, ‘देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघड दार देवा आता’ अशी गीते सादर करून सर्वांना भक्तिरसाचा आनंद दिला. आ.सुभाष झांबड, रतिलाल मुगदिया, अनिल मुनोत, महेंद्र बंब, डॉ.उमेश तातेड, उगमचंद कोठारी, चंदनमल परमार या परिवारांनी विविध देव-देवतांची आरती केली. पाळणा गीत म्हणून भगवान महावीरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महावीर पाटणी, मिठालाल कांकरिया, जी. एम. बोथरा, विलास साहुजी, रवी मुगदिया, विनोद बोकडिया, अनिल संचेती, तनसुख झांबड, संजय सुराणा यांच्यासह जैनबांधव हजर होते.

Web Title: Bhaktiswaramrit in Karnapura Jain temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.