Bharat Bandh : खुलताबाद येथे आंदोलकांनी वाहनधारकांना केले चॉकलेटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:07 PM2018-09-10T18:07:55+5:302018-09-10T18:09:35+5:30
कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेंस व मनसेच्या पदाधिका-यांनी आज सकाळी इंधन दर वाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने केली.
खुलताबाद (औरंगाबाद ) : कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेंस व मनसेच्या पदाधिका-यांनी आज सकाळी इंधन दर वाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने केली. यावेळी इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना आंदोलकांनी 'चॉकलेट'चे वाटप केले. बंदला तालुक्यातील गल्लेबोरगाव, सुलतानपुर, काटशिवरीफाटा, गदाणा य़ा ठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठींबा दिला. तर तालुक्यात उर्वरित ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत चालू होते.
जबर इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनता पुरती हैरान झाल्याने कॉग्रेंस, राष्ट्रवादी कॉग्रेंस व मनसे नी पुकारलेल्या बंद ला खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, गदाणा, सुलतानपूर, काटशिवरी फाटा,या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत येथील दुकाने शंभर टक्के बंद होती. त्यानंतर हळुहळु व्यवहार सुरू झाली. तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे जगन्नाथ खोसरे, शोभाताई खोसरे, उपसरपंच संजय भागवत ,तुकाराम हार्दे यांच्या नेतृत्वाखाली कन्नड रोडवरील पेट्रोल पंपावर निदर्शने करून सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.
तालुक्यातील फुलंब्री रोडवरील काटशिवरीफाटा, सुलतानपुर येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणा-या वाहनधारकांना कॉग्रेंसचे तालुकाध्यक्ष अनिल पा.श्रीखंडे, राष्ट्रवादी कॉग्रेंसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास चव्हाण, तालुकाध्यक्ष शंकरकाका आधाने, खुलताबादचे नगराध्यक्ष अँड. एस.एम. कमर, शहराध्यक्ष अब्दूल समद टेलर, आबेद जहागीरदार, माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी, रा.कॉ.जिल्हाउपाध्यक्ष दिनेश सावजी, कॉग्रेंस सेवादलाचे तालुकाध्यक्ष नीलेश पवार, माजी सभापती सुरेश चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती अनिल चव्हाण, सुदाम चव्हाण, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय होळकर, सुलतानपुरचे उपसरपंच वसंत चव्हाण, मिठ्ठू महालकर, बाळकृष्ण दांडेकर, खंडू खंडागळे, कय्यूम पटेल, प्रभाकर देवकर, परभत भांडे, सुरेश जाधव, विनोद जाधव, रमेश करपे, कैलास हरणे, भास्कर मोठे, आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक हजर होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
बाजार सांवगी येथे कॉग्रेंस पक्षाचे वसंतराव नलावडे चांदखॉ पठाण, प्रविण निकम यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. यावेळी पोहेकॉ संजय जगताप यांना निवेदन देण्यात आले. खुलताबाद शहरात बंदला कुठलाही फरक पडला नाही सर्व व्यवहार सुरळीत सुरू होती. सकाळपासूनच सर्व दुकानदारांनी आपला कारभार सुरू केला होता. एकदंरीत तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.