Bharat Bandh : मोर्चा, ठिय्या आंदोलनाने मराठवाड्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 03:58 PM2018-09-10T15:58:08+5:302018-09-10T16:15:55+5:30
इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
औरंगाबाद : कॉंग्रेस पक्षाकडून इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये कॉंग्रेससह विरोधी पक्षातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बसपा, सीपीएम आदी पक्षांनी सहभाग घेतला. व्यापाऱ्यांनी बाजारपेठा व पेट्रोल पंप बंद ठेवली.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधानाच्या दराविरोधात कॉंग्रेसकडून आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. यात देशभरातून २१ पक्षाचा पाठिंबा मिळाला. मराठवाड्यात आज सकाळपासूनच आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.
औरंगाबाद : शहरात कॉंग्रेसने पेट्रोल पंपावर निदर्शने केली, तर मनसेने क्रांती चौका निदर्शने केली. यावेळी मनसे आंदोलकांनी वाहनधारकांना ड्रॉपने थेंब थेंब पेट्रोल वाटप करत इंधन दरवाढीचा निषेध केला. तसेच त्यांनी एक फोटो पॉइंटसुद्धा उभारला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह 'मोदी सेठ इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद' असा मजकूर लिहण्यात आला आहे. येथे अनेकांनी सेल्फी काढली.
फुलंब्री -
सोयगाव -
बीड :
परळी -
गेवराई -येथे कडकडी बंद तसेच तालुक्यातील तलवाडा येथेही बंद पाळण्यात आला. बंदला मनसे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला.
जालना : पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर तसेच केंद्रासह राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने भारत बंद पुकारण्यात आला. या पार्श्वभूर्मीवर शहर काँग्रेच्यावतीने जिल्हाधिकार कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
हिंगोली :
औंढा - येथे भारत बंदला प्रतिसाद; बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली.
हिंगोली -
परभणी :
गंगाखेड - शहरात काँग्रेसच्यावतीने धिक्कार मोर्चाला सुरुवात,मोर्च्यात घोडा,बैलगाडीसह गाढवांचाही सहभाग.
लातूर :
नांदेड :
बिलोली - येथे आजच्या इंधन दरवाढी विरोधातील भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बसप व सिपीएमचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
किनवट -