भाजपाच्या विरोधात भारिपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:22 AM2017-09-25T00:22:17+5:302017-09-25T00:22:17+5:30
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या धोरणांच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारिप बहुजन महासंघाच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या धोरणांच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
२४ सप्टेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये १९३२ साली झालेल्या पुणे कराराचा गौरवदिन म्हणून आम्ही मानतो. ज्याद्वारे तत्कालीन अस्पृश्य व बहुजनांना विविध प्रकारचे आरक्षणाचे अधिकार प्रथमच मिळाले. परंतु, सध्याचे भाजप सरकार हे शैक्षणिक, नोकरीमधील आरक्षण संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले असून आजपर्यंत या विषयी राज्य शासनाने कोणतीही ठोस भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही. तेव्हा योग्य ती ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नोटाबंदी, पेट्रोल, डिझेल दरवाढ या भाजपाच्या निर्णयांचा यावेळी निषेध करण्यात आला. गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे इतर १० मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रवीण कनकुटे, भगवान देवरे, एन.जी. खंदारे, प्रा.डॉ.सुरेश शेळके, गौतम रणखांबे, बी.आर. आव्हाड, कमलेश ठेंगे, बी.जी. शिंदे, वामनराव हराळ, सुधाकर वाघमारे, विठ्ठलराव खंदारे, लखन सौंदरमल आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.