भीम जयंतीने शहरात संचारले चैतन्य, स‌ळसळता उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:04 AM2021-04-14T04:04:51+5:302021-04-14T04:04:51+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या भीतीमुळे विविध सण-उत्सवांच्या आनंदावर विरजन पडलेले आहे. कोरोनाची ही वर्षभरापासून पसरलेली मरगळ दूर सारून आंबेडकर जयंतीचा ...

Bhim Jayanti spread awareness and enthusiasm in the city | भीम जयंतीने शहरात संचारले चैतन्य, स‌ळसळता उत्साह

भीम जयंतीने शहरात संचारले चैतन्य, स‌ळसळता उत्साह

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या भीतीमुळे विविध सण-उत्सवांच्या आनंदावर विरजन पडलेले आहे. कोरोनाची ही वर्षभरापासून पसरलेली मरगळ दूर सारून आंबेडकर जयंतीचा उत्साह वस्त्यांमध्ये ओसंडून वाहत आहे. वसाहतीमध्ये भव्य प्रवेशद्वार, पताके, झिरमळ्यांसह विद्युत रोषणाई करून भीमजन्माचे जोरदार स्वागत केले जात आहे. याशिवाय रक्तदान शिबिरे, ऑनलाइन व्याख्याने, समाजमाध्यमांवर भीमगीतांच्या लाइव्ह मैफली दिवसभर सुरू होत्या.

शहरातील संजयनगर, मुकुंदवाडी, आंबेडकरनगर, बौद्धनगर, रमानगर, उस्मानपुरा, कबीरनगर, इटखेडा, क्रांतीनगर, किलेअर्क, लक्ष्मी कॉलनी, कोतवालपुरा, भीमनगर, भावसिंगपुरा, बौद्धवाडा पैठण गेट, समतानगर, शंभूनगर, काबरानगर, कांचनवाडी, हमालवाडा, राहुलनगर, जयभीमनगर, टाऊन हॉल, पंचशीलनगर यासह सर्वच वसाहती सजल्या आहेत. भव्य स्वागत कमानी, पताके व आकर्षक विद्युत रोषणाईचा सर्वत्र झगमगाट आहे.

ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन

कोरोनामुळे आरोग्यसेवेवर मोठा ताण आलेला असताना रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन आंबेडकरी अनुयायी तसेच विविध पक्ष-संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यात भडकल गेट येथे भीमसैनिकांनी, सुरेश वर्मा मित्रमंडळावतीने अजिंठा हॉल, छावणी येथे, भीमशक्ती व काँग्रेस अनुसूचित जाती शहर विभागाच्या वतीने पैठण गेट येथे अरुण शिरसाठ, संतोष भिंगारे यांनी, अहिल्याबाई होळकर चौक कोकणवाडी येथे वंचित बहुजन आघाडीचे मनोज वाहूळ यांनी, वंचितचे पंकज बनसोडे यांनी गोपाल टी कॉर्नर येथे, संजयनगर मुकुंदवाडी येथे सतीश गायकवाड आदींतर्फे रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी....

भडकल गेट, क्रांती चौक, औरंगपुरा, कोकणवाडी चौक, मिल कॉर्नर येथील महापुरुषांच्या पुतळ्यांवर बुधवारी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या महामारीसोबत लढा देणारे घाटी रुग्णालय, मिनी घाटी रुग्णालय, चिकलठाणा येथील आरोग्य, पोलीस कर्मचारी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. राजू शिंदे, विनोद पाटील, जयप्रकाश नारनवरे, कुणाल राऊत, सचिन बोर्डे, कमलेश चांदणे, संघर्ष सोनवणे हा उपक्रम राबवत आहेत.

२५ मोठे फलक...

जयभीमनगर टाऊन हॉल येथे बाबासाहेबांच्या विचारांचे सुमारे २५ मोठे फलक कुणाचेही छायाचित्र न लावता लावण्यात आले आहेत. जेतवन बुद्ध विहार, मिलिंद ग्रुपने यासाठी परिश्रम घेतले आहेत.

नागसेनवनातील सर्व महाविद्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भीमगीतांची मैफल...

विद्यापीठात सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने अजय देहाडे, चरण जाधव, कुणाल गायकवाड, सचिन भुईगळ आदी कलावंतांची भीमगीतांची मैफल घेण्यात आली. यासाठी दीक्षा पवार, लोकेश कांबळे, जयश्री शिरके, अक्षता दाभाडे यांनी परिश्रम घेतले. याशिवाय कुणाल वराळे, शाहीर मेघानंद जाधव यांनी जयंती गीतांचे फेसबुक लाइव्ह केले. अनेक कलावंतांनी समाजमाध्यमांवर भीमगीतांच्या मैफली रंगविल्या होत्या.

रिपब्लिकन सेनेचे मिलिंद बनसोडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून ७ दिवस विविध वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली होती. त्यात डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजय मून, डॉ. शेखर मगर, प्राचार्य सुनील वाकेकर, सुदाम चिंचाणे आदींनी भूमिका विषद केली. दि.१४ एप्रिल रोजी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर हे अध्यक्षीय समारोप करतील.

बादशाह ग्रुपच्या वतीने मिलकॉर्नर येथील ध्वज स्तंभाचे सुशोभीकरण करण्यात आले.

नागसेनवनातील लुम्बिनी उद्यान येथे सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह परिसरात

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी, माजी विद्यार्थ्यांच्या व मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी सकाळी स्वच्छता करण्यात आली.

Web Title: Bhim Jayanti spread awareness and enthusiasm in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.