भीमा-कोरेगावच्या घटनेचे औरंगाबाद शहरात पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:45 AM2018-01-02T00:45:43+5:302018-01-02T00:45:47+5:30

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे सोमवारी दुपारपासून शहरात तीव्र पडसाद उमटले. शहराच्या विविध भागांत दलित समाजातील संतप्त कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायला लावली. काही भागांत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. तीन एसटी बसेसवर दगडफेक झाली. दुपारपासून सुरु झालेला हा तणाव रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होता.

 Bhima-Koregaon incident falls in Aurangabad city | भीमा-कोरेगावच्या घटनेचे औरंगाबाद शहरात पडसाद

भीमा-कोरेगावच्या घटनेचे औरंगाबाद शहरात पडसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे सोमवारी दुपारपासून शहरात तीव्र पडसाद उमटले. शहराच्या विविध भागांत दलित समाजातील संतप्त कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायला लावली. काही भागांत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. तीन एसटी बसेसवर दगडफेक झाली. दुपारपासून सुरु झालेला हा तणाव रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होता. या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाची मदत घेत शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. रात्रीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भीमा कोरेगावच्या घटनेची माहिती कळताच सुरुवातीला उस्मानपुरा आणि क्रांती चौक भागात दलित समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यामुळे कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याचवेळी उस्मानपुरा रोडवरील एका शोरुमवर दगड भिरकावल्याने शोरुमच्या प्रवेशद्वाराची काच फुटली. यानंतर हा जमाव उस्मानपुºयाकडे गेला. कार्यकर्त्यांनी उस्मानपुरा ते पीरबाजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. याचेवळी त्रिमुर्ती चौकातही कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहरातील घटनांची माहिती वेगाने पसरल्याने त्यानंतर मुकुंदवाडी, रामनगर, पैठणगेट रोड आदी भागांत व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली.
जय भवानीनगर भागातही कार्र्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याठिकाणी एका एटीएमवर दगडफेक झाली.
टी.व्ही. सेंटर येथे सुमारे हजार लोकांचा जमाव रस्त्यावर आला. यावेळी तेथील होर्डिंग जमावाने पाडून टाकले. यानंतर जमाव भाजी मार्केटमध्ये घुसला. तेथील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या उलट्या करून पुढे गेला. यामुळे लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. नक्षत्रवाडी, कांचनवाडी येथील दुकानांच्या काचा फोडण्यात आल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. मुकुंदवाडी, रामनगर येथील एका हॉस्पिटलवर दगडफेक करण्यात आली. सायंकाळपर्यंत या भागातील व्यवहार पूर्णपणी थंडावले.
सायंकाळच्या वेळी कॅनॉट मार्केटमध्येही दुकाने (पान २ वर)
१५ बसेस फोडल्या
औरंगाबादसह विविध ठिकाणी सोमवारी एसटी महामंडळाच्या १५ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या. आमखास मैदानाजवळ जळगाव - वैजापूर बसच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये वाहकाला मार लागला. टाऊन हॉल येथे तीन बसच्या तर हर्सूल येथे दोन बसच्या काचा फोडण्याचे प्रकार झाले. याबरोबरच क्रांतीचौक, अंबेलोहळ, सिल्लोड, डोंगरगाव फाटा याठिकाणी बसेसच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या. रात्री उशिरा कांचनवाडी येथे दोन मालवाहतूक ट्रक फोडले..
अफवांवर विश्वास ठेवू नका -ढाकणे
नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले. शहराचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, एसआरपीएफची एक तुकडी शहरात तैनात करण्यात आली. सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहे.
आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा
भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी समाजावर झालेल्या दगडफेकीची घटना ही निषेधार्ह आहे. भीमा-कोरेगावपासून अहमदनगरपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी गाड्यांवर दगडफेक व जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. या घटनेचा रिपाइंच्या वतीने निषेध करतो. या घटनेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातही पडसाद उमटले. आंबेडकरी समाजाने संयम बाळगावा. शांततेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेने या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी केले आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रा. अविनाश डोळस यांनी आंबेडकरी जनतेने संयम बाळगून या घटनेचा शांततेने निषेध करावा, असे आवाहन केले.
माजी मंत्री गंगाधर गाडे यांनीही पीरबाजार परिसरात कार्यकर्त्यांसमोर बोलताना शांततेचे आवाहन केले.
यासंदर्भात रमेशभाई खंडागळे, रिपाइंचे नेते दौलतदादा खरात, शहराध्यक्ष किशोर थोरात, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ आदींनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.

Web Title:  Bhima-Koregaon incident falls in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.