बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर

By स. सो. खंडाळकर | Published: April 14, 2023 08:57 PM2023-04-14T20:57:25+5:302023-04-14T20:57:54+5:30

एरवी गटातटात विभागलेल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी एकत्रितपणे होऊन व एकमेकांना ‘जयभीम’ घालून हे गटतट जणू विरघळून जात होते.

Bhimsagar in Bhadkalgate area to greet Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर

बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भडकलगेटवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमसागर उसळला होता. चौक परिसर माणसांनी फुलून गेला होता. विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी न थकता येतच राहिले. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ शिडीद्वारे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच जोश संचारत असे आणि जोरात घोषणा सुरू होत असत. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जबतक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.

एरवी गटातटात विभागलेल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी एकत्रितपणे होऊन व एकमेकांना ‘जयभीम’ घालून हे गटतट जणू विरघळून जात होते. फुले - शाहू - आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची या ठिकाणची आवर्जून उपस्थिती हे वैशिष्ट्यच होय. अलीकडे भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे या सारख्या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते इकडे ओढले जात आहेत आणि तेही जत्थ्या-जत्थ्याने अभिवादनासाठी येत होते.

आजही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे ओबीसी व सहकार मंत्री अतुल सावे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे, संजय केणेकर, पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राजू वैद्य, बंडू ओक, सुनीता आऊलवार, कमल चक्रे, समता परिषदेचे मनोजभाऊ घोडके, सावता मंदिर वसतिगृहाचे रामभाऊ पेटकर हे सारे अभिवादनासाठी आवर्जून आलेले होते.

Web Title: Bhimsagar in Bhadkalgate area to greet Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.