'बीएचआर'च्या अध्यक्षासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:23 PM2017-11-16T23:23:12+5:302017-11-16T23:23:17+5:30
मुदतठेवीवर १३ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मुदतठेव म्हणून घेतलेले दोन लाख रुपये परत देण्यास इन्कार करून विश्वासघात केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या संस्थापक, चेअरमन, संचालक, व्यवस्थापक यासह १६ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : मुदतठेवीवर १३ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मुदतठेव म्हणून घेतलेले दोन लाख रुपये परत देण्यास इन्कार करून विश्वासघात केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या संस्थापक, चेअरमन, संचालक, व्यवस्थापक यासह १६ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड शहरातील टिळकनगर भागात राहणारे बद्रीनारायण शर्मा यांनी येथील न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. यातील आरोपींनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रे डिट सोसायटी पतसंस्थेची शाखा शहरात सुरू केली. फिर्यादीस त्यास ठेव रकमेवर १३ टक्के दरसाल दरशेकडा व्याजाचे आमिष दाखवून २७ जुलै २०१३ रोजी एक लाख व २४ जानेवारी २०१४ रोजी एक लाख रुपये मुदतठेव जमा करून घेतली. ही रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज केला असता यातील आरोपींनी रक्कम परत देण्यास इन्कार करून विश्वासघात करून फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि. बालाजी वैद्य करीत आहेत.