बीएचआरच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

By Admin | Published: June 20, 2017 06:57 PM2017-06-20T18:57:24+5:302017-06-20T19:00:34+5:30

ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीचे (बीएचआर) अध्यक्षासह संचालक मंडळाविरोधात

The BHR president filed a complaint with the board of directors | बीएचआरच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

बीएचआरच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 20 -  ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीचे (बीएचआर) अध्यक्षासह संचालक मंडळाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात शुक्रवारी ( ८ जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला .
मुदत संपल्यानंतरही ठेवी व त्यावरील व्याज अशी सूमारे दोन कोटी रुपये देण्यास सोसायटीने न देता विश्वासघात केल्याचे गुंतवणूकदारांनी तक्रारीत नमूद केले आहे. भालचंद्र ओंकार खोडे (वय ७६, रा. जयभवानीनगर) असे फियार्दीचे नाव आहे. सेवानिवृत्त असलेल्या खोडे यांनी १७ एप्रिल २०१३ रोजी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीच्या एन सहा सिडको येथील शाखेत ठेव म्हणून ९५ हजार ७६८ रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर आकर्षक व्याजदर, परतावा मिळेल, असे सोसायटीतर्फे सांगण्यात आले. खोडे यांच्या प्रमाणेच एन ८ सिडको परिसरातील महालक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी मच्छिंद्र सुर्यभान सुरासे (वय ५७) यांनी १ लाख १३ हजार रुपयांची ठेव या सोसायटीत ठेवली होती. पण, मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज देण्यास सोसायटीने टाळाटाळ केली.
पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या फियार्दी खोडे व सुरासे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष भाईचंद हिराचंद रायसोनी (रा. जि. जळगाव) यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले. दरम्यान सीआयडी पोलिसांनी आज त्यांना जळगावहुन हस्तांतरित करून औरंगाबादला आणले. न्यायालयाने १४ आरोपींना २३ जून पर्यंत कोठडी सुनावली आहे. याबाबत २० जानेवारी २०१६ ला गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: The BHR president filed a complaint with the board of directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.