राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 03:16 PM2024-10-31T15:16:20+5:302024-10-31T15:18:01+5:30
दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले...
महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीच्या या धामधुमीतच दिवाळीही आली आहे. दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले.
"माझ्या लहाणपणी काही ठरावीक प्रकारचेच फटाके होते. आता काळ बदलला आहे. आता विविध प्रकारचे फटाके बाजारात येत आहेत. यावेळी त्यांनी लवंगी फटाक्याने हात भाजल्याची आठवणीही सांगितली. तसेच, आम्ही राजकारणातही अनेक फटाके फोडले आहेत. कुणाच्या बुडाखालीही लावले आहेत. पण एक आहे, आम्ही कधी मर्यादा सोडली नही. फटाका तर नक्की फोडायचा मात्र तो फारसा हानीकारक नसावा, असे आमचे मत असते," असे शिरसाट म्हणाले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
यावेळी त्यांना, काही नेत्यांची नावं घेत, संबंधित नेत्यासाठी कोणता फटाका खरेदी कराला? असे विचारले असता, त्यांनी वर्णन करत फटाक्यांची नावं सांगितली. यात, संजय राउतांसाठी फटाका खरेदी करायचा असे तर कोणता फटाका खरेदी कराल? असे विचरले असता, शिरसाट म्हणाले, तो फटाका नाहीये, ते 'भुई चक्कर' आहे. स्वतःपुरते गोल गोल फिरणे. स्वतःची प्रसिद्धी करणे. यासाठी त्यांना हे भूई चक्कर परफेक्ट बसते. म्हणून त्यांना याचे प्रेझेंट द्यायला हवे.
आदित्य ठाकरेंसाठी सुरसुरी तर सुषमा अंधारेंसाठी... -
यानंतर आदित्य ठाकरेंसाठी कोणता फटाका खरेदी कराल असे विचारले असता शिरसाट म्हणाले, 'सुरसुरी' शिवाय दुसरा नाही. कारण त्याला इजा होऊ नये. हेच त्याच्यासाठी परफेक्ट आहे. सुषमा अंधारेंसंदर्भात बोलताना ते म्हणाले, त्यांच्यासाठी 'सापाची गोळी' घ्यायला हवी. जागच्या जागी फणा मारणार आणि शांत. याशिवाय उद्धव ठाकरेंसाठी 'अनार'. एका ठिकाणी ठेवा, ते वर जातात, दोन मिनिटांसाठी लख्ख प्रकाश होतो आणि पुन्हा शांत बसतात. ते टोमणे जसे मारतात ना, तसा अनार, हा कुणाला त्रास देत नाही, गेगीच वर जातो आणि शांत होतो.
मुख्यमंत्री शिंदेंसाठी सुतळी बॉम्ब तर फडणवीसांसाठी... -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री हे सुतळी बॉम्ब सारके आहेत. एक तर त्याला फोडायला हिंमत लागते, दिसतो छोटा पण वाजा मोठा होतो, तो क्रांती घडते. म्हणून त्यांच्यासाठी सुतळी बॉम्ब परफेक्ट आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सध्या रिव्हॉल्वरच्या भूमिकेत आहेत. त्यांना ऐतिहासिक रिव्हॉल्वर द्यायला हवी, असे शिरसाट म्हणाले.