भूईमुगाला मिळाला ४ हजार रूपयांचा भाव
By Admin | Published: May 19, 2014 11:49 PM2014-05-19T23:49:22+5:302014-05-20T00:05:38+5:30
जवळा बाजार : येथील आठवडी बाजारात रविवारी भूईमुगाची मोठी आवक झाली होती. या ठिकाणी भुईमुगाला ३२०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
जवळा बाजार : येथील आठवडी बाजारात रविवारी भूईमुगाची मोठी आवक झाली होती. या ठिकाणी भुईमुगाला ३२०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हरभर्यास ५ हजार ते ६ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मात्र शेतकर्यांचे पांढरे सोने समजले जाणार्या कापसाला ४ हजार रूपये भाव मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गहू १३०० ते १४०० तर ज्वारी ९०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. (वार्ताहर)