मयुर नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:03 AM2021-02-24T04:03:57+5:302021-02-24T04:03:57+5:30

गायरान जमीनधारकांचा ठिय्या औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गायरान जमीनधारकांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला होता. ३० वर्षांपासून ती ...

Bhumi Pujan of Cement Concrete Road at Mayur Nagar | मयुर नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

मयुर नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

googlenewsNext

गायरान जमीनधारकांचा ठिय्या

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गायरान जमीनधारकांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला होता. ३० वर्षांपासून ती जमीन २२ ते २५ जणांची शेतवस्ती आहे. त्यावर काही घरेदेखील होती, ती घरे सोमवारी मध्यरात्री अतिक्रमण म्हणून काढण्यात आल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागत निवेदन दिले.

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे आवाहन

औरंगाबाद : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबिटी पोर्टलवर ११ जानेवारीपर्यंतच्या अर्जांसाठी लॉटरी प्रक्रिया राबविली. निवड झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश देण्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांना संदेश मिळाला आहेत. त्यांनी महाडीबिटी पोर्टल संकेतस्थळावर जाऊन पुढील कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

संत गाडगेबाबा जयंती साजरी

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, संगीता चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर आदींची उपस्थिती होती.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त महाप्रसाद

औरंगाबाद : राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम गजानन कॉलनी येथे घेण्यात आला. माजी नगरसेवक राजू वैद्य, मिथुन व्यास, डेबूजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश राऊत, शहराध्यक्ष गणेश गायकवाड, किसन गवळी, शरद कुलकर्णी, बापू कवळे, राम केकाण, कैलास तिवलकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Bhumi Pujan of Cement Concrete Road at Mayur Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.