सिंदेवाही तालुक्यात ४० कोटींच्या कामांचे भूमिपूजन
By Admin | Published: October 6, 2016 01:46 AM2016-10-06T01:46:00+5:302016-10-06T01:46:00+5:30
आमदार विजय वडेट्टीवार यांनी आमदार निधीतून सिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामे मंजूर केली आहेत
संजय तिपाले , बीड
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत बुधवारी पार पडली. नव्या आरक्षणाने मातब्बर पदाधिकाऱ्यांत ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण आहे. तथापि, मतदारसंघ पुनर्रचनेत केज तालुक्यातील येवता गट बरखास्त झाला असून गेवराई व परळी तालुक्यात अनुक्रमे रेवकी व नागापूर या नव्या गटांची निर्मिती झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे आता सदस्य संख्या ५९ वरुन ६० वर पोहचली आहे.
आरक्षणामुळे पाच वर्षांपूर्वी अडचण झाल्याने काही नेत्यांनी पर्यायी गटातून नशीब आजमावत ‘मिनी मंत्रालय’ गाठले होते; परंतु नव्या आरक्षणनंतर ते ‘सेफ झोन’ मध्ये आले आहेत. काहींची मात्र अडचण झाली आहे. विद्यमान अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी पाच वर्षांवर्षी मादळमोही गटातून जि.प. गाठली होती. यावेळी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने त्यांच्यापुढे चकलांबा, उमापूर या गटांचा पर्याय आहे. उपाध्यक्षा आशा दौंड या पट्टीवडगाव गटातून निवडून आल्या होत्या. हा गट सर्वसाधारण असल्याने त्यांची अडचण नाही. अर्थ व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांनी लिंबागणेशमधून जि.प. गाठली होती. यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी जागा राखीव आहे. राजुरी हे त्यांचे ‘होमपिच’ ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांची अडचण नाही. समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे हे अंमळनेर गटाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना नव्या गटाचा शोध घ्यावा लागेल. शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे हे युसूफवडगाव गटातून विजयी झाले होते. आता हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून त्यांना चिंचोली माळी या गटाचा पर्याय आहे.
महिला बालकल्याण सभापती कमल मुंडे यांची फारशी अडचण नाही. वडवणी गट बरखास्त झाल्याने त्या चिखलबीडमधून लढू शकतात. ५० टक्के महिला हमखासच निवडून येणार आहेत. सर्वसाधारण गटांतूनही महिला नशीब आजमावू शकतात.