पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:05 AM2021-03-07T04:05:11+5:302021-03-07T04:05:11+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ हा वैजापूर शहरातून गेलेला आहे. या महामार्गावर १९७९ मध्ये पुतळा उभारला गेला होता. त्यानंतर नवीन ...

Bhumipujan of full size statue work | पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन

पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन

googlenewsNext

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ हा वैजापूर शहरातून गेलेला आहे. या महामार्गावर १९७९ मध्ये पुतळा उभारला गेला होता. त्यानंतर नवीन पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी जनतेकडून करण्यात आली. यासाठी तत्कालीन उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. नंतर प्रशासकीय पातळीवर पालिकेला नवीन स्मारक उभारण्याची परवानगी दिली गेली. या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.५) मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दिनेश परदेशी, नगरसेवक दशरथ बनकर, प्रकाश चव्हाण, शेख रियाज, शैलेश चव्हाण, पारस घाटे, डाँ. निलेश भाटीया, सखाहरी बर्डे, दिनेश राजपूत, प्रीती भोपळे, सुप्रिया व्यवहारे , अमीर सय्यद, अे. टी. पगारे, राजेश गायकवाड, यशवंत पडवळ, सिद्धार्थ तेजाड, मंगेश गायकवाड, रियाज पठाण आदींची उपस्थिती होती.

फोटो :

Web Title: Bhumipujan of full size statue work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.