टाळेबंदीत बीबी का मकबरा काळवंडला, पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,  मनो-यावर उगवल्या वनस्पती, तडेही गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:40 AM2020-08-31T06:40:56+5:302020-08-31T06:41:11+5:30

सध्या पर्यटन केंद्रे बंद असल्याने दुरुस्तीची कामे कोणत्याही अडथळ्याविना सहज करणे शक्य आहे. मकबºयाच्या संवर्धनासाठी तीन वर्षांपासून निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते.

Bibi ka maqbara kalwandala under lock Down, neglected by archeological survey officials | टाळेबंदीत बीबी का मकबरा काळवंडला, पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,  मनो-यावर उगवल्या वनस्पती, तडेही गेले

टाळेबंदीत बीबी का मकबरा काळवंडला, पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,  मनो-यावर उगवल्या वनस्पती, तडेही गेले

googlenewsNext

- योगेश पायघन
औरंगाबाद : दख्खन का ताज म्हणून विख्यात असलेला बीबी का मकबरा आणि त्याचे दिमाखदार उंच मनोरे आता पुरते काळवंडले आहेत. प्लास्टरच्या जागोजागी खपल्या पडल्या आहेत, मनोºयावर वनस्पती उगवल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये संवर्धनाची कामे का केली जात नाहीत, तसेच तीन वर्षांपासून रखडलेल्या संवर्धनाच्या कामांना मुहूर्त कधी लागेल, असा सवाल केला जात आहे.
सध्या पर्यटन केंद्रे बंद असल्याने दुरुस्तीची कामे कोणत्याही अडथळ्याविना सहज करणे शक्य आहे. मकबºयाच्या संवर्धनासाठी तीन वर्षांपासून निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. दोन वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या महासंचालक डॉ. उषा शर्मा यांनी पाहणीवेळी संवर्धनाकडे झालेल्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संवर्धनासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर काहीशा हालचाली झाल्या. जुजबी दुरुस्तीनंतर पुन्हा मकबºयाचे संवर्धन थंड बस्त्यात पडले आहे.

आता लॉकडाऊनचे निमित्त
‘लोकमत’ने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डॉ. दिलीपकुमार खमारी यांना विचारल्यावर त्यांनी लॉकडाऊननंतर यावर बोलू, असे ते म्हणाले.

अंदाजपत्रक मंजुरीनंतर
सरली तब्बल तीन वर्षे
संवर्धनासाठी अंदाजपत्रक मंजूर होऊन निविदाही निघाली. मात्र, गाडी कुठे अडली हे गुलदस्त्यात आहे. पुरातत्व विभागाच्या निकषांत बसणारे चुन्याचे दर्जेदार काम करणारे कारागीर मिळत नसल्याचे कारणही याबद्दल सांगितले जाते, तर कधी निविदा घ्यायलाच कुणी पुढे येत नाही, असे काही अधिकारी सांगतात.

सध्या पर्यटक नसल्याने ऐतिहासिक वास्तूंच्या दुरुस्त्या आणि संवर्धनासाठी त्याचा वापर पुरातत्व विभागाने करून घ्यायला हवा होता. ऐतिहासिक वारसे सांभाळण्याकडे या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, टाळाटाळ होत आहे. मकबºयाच्या बाहेरील भिंतींना तडे जात आहेत. तेथील किमान साफसफाई, दुरुस्ती करणे अपेक्षित होते.
- अ‍ॅड. स्वप्नील जोशी, इतिहासप्रेमी

Web Title: Bibi ka maqbara kalwandala under lock Down, neglected by archeological survey officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.