बिडकीन आठवडी बाजारात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:02 AM2021-02-25T04:02:26+5:302021-02-25T04:02:26+5:30
बिडकीन : प्रशासनाच्या वतीने कोरोनोच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
बिडकीन : प्रशासनाच्या वतीने कोरोनोच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने बुधवारी बिडकीन येथील आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे पैठण तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद आहेत. बुधवारी बिडकीन येथे भरणारा परिसरातील सर्वात मोठा आठवडी बाजार बंद असल्याने तेथे शुकशुकाट दिसून आला. काही शेतकरी व व्यापारी हे भाजीपाला घेऊन आले होते. प्रशासन व पोलिसांनी मंगल कार्यालय परिसरात त्यांना भाजीपाला विक्री करण्यास मज्जाव करून हाकलून दिले. यामुळे गोरक्षनगरमधील रस्त्यावर भरणाऱ्या भाजीमंडीस बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते, तर काही भाजीपाला विक्रेते हे बाजारपेठेतील रस्त्यावरच भाजीपाला विक्री करीत होते. बाजारात कोठेही गर्दी होणार नाही, याकडे प्रशासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक पंकज उदावंत आदी परिस्थितीवर नजर ठेवून होते.