बॉलीवूडला छत्रपती संभाजीनगरची भुरळ; मुव्ही, वेबसिरीज शूटिंगमधून शहराने कमावले ४५ कोटी

By प्रशांत तेलवाडकर | Published: September 19, 2023 08:16 PM2023-09-19T20:16:44+5:302023-09-19T20:17:49+5:30

जवान, डिस्पॅच, श्री, अवनीचे चित्रपट : वेबसिरीजची पोस्ट प्रॉडक्शन शूटिंग

Big actors in Chhatrapati Sambhajinagar; The city earned 45 crores from the shooting of films, web series | बॉलीवूडला छत्रपती संभाजीनगरची भुरळ; मुव्ही, वेबसिरीज शूटिंगमधून शहराने कमावले ४५ कोटी

बॉलीवूडला छत्रपती संभाजीनगरची भुरळ; मुव्ही, वेबसिरीज शूटिंगमधून शहराने कमावले ४५ कोटी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सुपरहिट ठरला आहे. याच चित्रपटातील साहसी दृश्याचे शूटिंग बिडकीन एमआयडीसीतील ८ लेन रस्त्यावर झाले. यामुळे बाॅलिवूडचे लक्ष या ऐतिहासिक शहरावर केंद्रित झाले. त्यानंतर काही हिंदी चित्रपटांतील दृश्यांचे शूटिंग चिकलठाणा विमानतळावर झाले. याशिवाय काही वेबसिरीजचे पोस्ट प्रॉडक्शन शूटिंगही येथेच झाले. या शूटिंगपोटी मागील वर्षभरात छत्रपती संभाजीनगरमध्ये ४५ कोटींची उलाढाल झाली. यातील ३० कोटी तर एकट्या ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमुळे आले.

मुंबईतील चित्रपट सीटीपेक्षा छत्रपती संभाजीनगरमध्ये निम्म्या बजेटमध्ये शूटिंग होते. जिल्ह्यात चांगली स्थळेही आहेत; पण आतापर्यंत फारसे कोणाचे लक्ष इकडे गेले नव्हते. ‘जवान’ चित्रपटाची शूटिंग झाली आणि शहराने सर्वांचे लक्ष वेधले. यामुळे एकानंतर एक चित्रपटांचे शूटिंग येथे सुरू झाले.दिग्दर्शक व निर्माता तुषार हिरानंदानी यांच्या ‘श्री’ चित्रपटातील काही दृश्यांची शूटिंग चिकलठाणा विमानतळावर झाली. अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री अलिया फर्निचरवाला आले होते. दिग्दर्शक व निर्माता जितेंद्रपाल सिंग यांच्या ‘अवनी’ या चित्रपटाचे शूटिंगही ‘विमानतळावर’ झाले. ‘कमिंग होम’ या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन शूटिंग अजिंठा व वेरूळमध्ये झाले. मनोज वाजपेयीच्या ‘डिस्पॅच’ चित्रपटाचे शूटिंगही झाले. मराठवाड्यातील एका हत्याकांडावर आधारित एका वेबसिरीजची, अभिनेता गुलकंद टेल्स या वेबसिरीजचे पोस्ट प्रॉडक्शन शूटिंग येथेच झाले.

जिओग्राफी चॅनलच्या ‘पोस्ट कार्ड महाराष्ट्र’ मालिकेचे ६ दिवस शूटिंग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर झाले. सप्टेंबर २०२२ ते २०२३ दरम्यान झालेल्या शूटिंगपोटी शहरात ४५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. येत्या काळातही बिग बजेट सिनेमाचे शूटिंग शहरात होईल. यामुळे येथील कलाकारांनाही मोठ्या संधी असल्याची माहिती एट अवर्सचे संचालक किशोर निकम यांनी दिली.

बॉलिवूडच्या सुपरस्टारचा तीन दिवस शहरात होता मुक्काम
आगामी चित्रपटाच्या शूटिंगचे स्पॉट पाहण्यासाठी बॉलिवूडमधील एक सुपरस्टार नुकताच तीन दिवस शहरात मुक्काम करून गेला. या काळात त्याने जिल्ह्यातील शूटिंगसाठीचे विविध स्पॉट पाहिले. याबद्दल मोठी गुप्तता पाळण्यात आली. येत्या काही महिन्यांत त्याच्या चित्रपटातील कथानक आपल्या जिल्ह्यात चित्रीत होणार आहे.

Web Title: Big actors in Chhatrapati Sambhajinagar; The city earned 45 crores from the shooting of films, web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.