उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:57 PM2024-10-28T16:57:26+5:302024-10-28T16:59:07+5:30

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना धक्कादायक निर्णय, कारण काय? 

Big blow to Uddhav Sena; Aurangabad-central candidate Kishanchand Tanwani suddenly withdraws from the election | उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगाबाद-मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने उद्धव सेनेला खूप मोठा फटका बसला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यामागे कोणते कारण असावे, ठाकरे सेने आता ऐनवेळी दूसरा कोणता उमेदवार मैदानात उतरवणार याबाबत राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतांश ठिकाणी शिंदे सेना आणि ठाकरे सेना अशी लढत होणार आहे. शहरातील मध्य मतदार संघामध्ये शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर ठाकरे सेनेकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, तनवाणी यांनी कालच उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची रॅली बाजारपेठेत गर्दी होऊन नागरिकांना त्रास होईल असे कारण देत रद्द केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालमित्र आहेत. यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. दोघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. यावेळी देखील प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी आणि एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात आहेत. २०१४ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो. परंतु ते पाठिंबा देण्यास तयार नाहीत. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे उमेदवार तनवाणी यांनी केली. 

गटबाजीमुळे माघार? 
तनवाणी यांच्या या निर्णया मागे पक्षांतर्गत गटबाजी असल्याची बोलले जात आहे .याविषयी मात्र तनवाणी यांनी भाष्य केले नाही. तर पक्षाकडून देण्यात येणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहू असेही तनवाणी यांनी जाहीर केले. 

Web Title: Big blow to Uddhav Sena; Aurangabad-central candidate Kishanchand Tanwani suddenly withdraws from the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.