मोठे परिवर्तन! नोंदणी पद्धतीने शुभमंगल; अनेकांचा वाढतो आहे कल

By विकास राऊत | Published: November 10, 2023 05:43 PM2023-11-10T17:43:17+5:302023-11-10T17:44:12+5:30

सहा. जिल्हा निबंधक तथा विवाह अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी विवाह करण्यात येतो.

Big change! marriage by way of registration; increasing trend | मोठे परिवर्तन! नोंदणी पद्धतीने शुभमंगल; अनेकांचा वाढतो आहे कल

मोठे परिवर्तन! नोंदणी पद्धतीने शुभमंगल; अनेकांचा वाढतो आहे कल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात व शहरात गेल्या सहा वर्षांत २८५५ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. नोंदणी पद्धतीने शुभमंगल करण्याकडे अनेकांचा कल वाढत असल्याचे या आकड्यांवरून दिसते आहे. २०१८ पूर्वी १०० ते २०० च्या दरम्यान नोंदणी विवाह होत असत, ते प्रमाण आता दरवर्षी सरासरी ६०० च्या आसपास गेले आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कोठे मिळते?
सहा. जिल्हा निबंधक तथा विवाह अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी विवाह करण्यात येतो. नोंदणीनंतर तेथे प्रमाणपत्र मिळते. तसेच महापालिकेतही विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळते.

कागदपत्रे काय लागतात?
वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला, त्यात शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखल्याच्या मूळप्रतीसह सत्यप्रती लागतात. तसेच ॲफिडेव्हिट द्यावे लागते. रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, पासपोर्ट यापैकी जो उपलब्ध असेल तो पुरावा व विवाह नोंदणी करताना साक्षीदारांची गरज असते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक कशासाठी?
लग्नाचे प्रमाणपत्र अधिकृत कागदपत्र म्हणून कायदेशीर प्रकरणात वापरले जाते. प्रमाणपत्राद्वारे वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्यास मदत होते. कायदेशीर हक्कासाठी लढता येते. मुलांचा कायदेशीर ताबा मिळण्यासाठी तसेच पासपोर्ट सेवा, रहिवासी दाखला मिळण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होतो. लग्नाचा भक्कम कायदेशीर पुरावा मनाला जातो.

सहा वर्षांत किती नोंदणी?
२०१८: ३००
२०१९: ५०१
२०२० : ३२४
२०२१ : ४६५
२०२२ : ५५९
२०२३: ७१० (ऑक्टोबरपर्यंत)

नोंदणी विवाहांचे प्रमाण वाढतेय ....
नोंदणी विवाह करण्याकडे कल वाढतो आहे. मागील दोन वर्षांतील आकड्यांवरून ते दिसते. कमी खर्चात विवाह होत असल्यामुळे खर्च, वेळ, श्रम वाचत असल्याने नोंदणी विवाह पद्धतीचे प्रमाण वाढू लागले आहे.
-सतीश कुलकर्णी, सहा जिल्हा निबंधक तथा विवाह अधिकारी

Web Title: Big change! marriage by way of registration; increasing trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.