मोठी बातमी! आदर्श पतसंस्थेच्या १९ कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीचे आदेश, लवकरच लिलाव
By विकास राऊत | Published: September 27, 2023 12:14 PM2023-09-27T12:14:42+5:302023-09-27T12:15:09+5:30
सर्व कर्जदारांनी त्यांच्याकडील कर्ज रक्कम तत्काळ भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या १९ कर्जदारांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी रात्री जारी केले आहेत.
या १९ कर्जदारांच्या मालमत्तांच्या लिलावातून २ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम वसूल होईल. पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. त्यावर प्रशासक समिती नेमण्यात आली आहे. पतसंस्थेच्या थकबाकीदार कर्जदारांकडून कर्ज वसुली करण्यासाठी संस्थेतर्फे कर्जदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांची सहकार कायद्यानुसार जप्ती करून त्या मालमत्तांचा ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १९ कर्जदारांच्या मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी आदेश जारी केले आहेत. सर्व कर्जदारांनी त्यांच्याकडील कर्ज रक्कम तत्काळ भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी केले आहे.