मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:57 IST2025-01-08T13:55:32+5:302025-01-08T13:57:30+5:30

पराभूत उमेदवारांनी घेतली न्यायालयात धाव; कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका?

Big news! Election of thirty-five MLAs including Sanjay Shirsat, Dhananjay Munde, Suresh Dhas challenged in Aurangabad High Court | मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या आहेत. निवडणूक याचिका दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही घेतलेल्या आक्षेपांची निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मतदार यादीतून वगळण्यात आलेली आणि नव्याने समाविष्ट केलेली नावे, प्रचारादरम्यान तसेच मतदान प्रक्रिया सुरू असताना झालेला आचारसंहितेचा भंग आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका?
-औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विजयी झालेले संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे
-परळीतून विजयी झालेले धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे
-आष्टीचे आमदारसुरेश धस यांच्याविरुद्ध महेबूब शेख
-घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांच्याविरुद्ध राजेश टोपे
-बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याविरुद्ध बबलू चौधरी
-भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्याविरुद्ध चंद्रकांत दानवे
-परांडा येथील आमदार तानाजी सावंत यांच्याविरुद्ध राहुल मोटे
-जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध कैलास गोरंट्याल
-लातूरचे आमदार रमेश कराड यांच्याविरुद्ध सर्जेराव मोरे
-केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याविरुद्ध पृथ्वीराज साठे
-उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्याविरुद्ध सुधाकर भालेराव
-वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्याविरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर
-अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याविरुद्ध विनायकराव पाटील
-धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांच्याविरुद्ध प्रवीण चौरे
-पारोळाचे आमदार अमोल पाटील यांच्याविरुद्ध सतीश पाटील

अहिल्यानगर जिल्ह्यातून आठ याचिका
अहिल्यानगर जिल्ह्यातून आठ जणांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. यात संगमनेरचे आमदार अमोल खटाव यांच्याविरुद्ध बाळासाहेब थोरात, कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध राम शिंदे, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध अभिषेक कळमकर, शेगावच्या आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्ध ॲड. प्रताप ढाकणे, राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध प्राजक्त तनपुरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याविरुद्ध अमित भांगरे, पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांच्याविरुद्ध राणी लंके यांनी आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्याविरुद्ध संदीप वरपे यांचा समावेश आहे.

Web Title: Big news! Election of thirty-five MLAs including Sanjay Shirsat, Dhananjay Munde, Suresh Dhas challenged in Aurangabad High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.