मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला

By विकास राऊत | Published: July 10, 2024 10:05 AM2024-07-10T10:05:48+5:302024-07-10T10:06:02+5:30

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी ७.१५ वाजता झाली.

Big news! Epicenter of earthquakes in Hingoli, mild tremors in Chhatrapati Sambhajinagar | मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला

मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला

छत्रपती संभाजीनगर: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी ७.१५ वाजता झाली. सदर भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड ,परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यांतील काही भागात जाणवले. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तहसीलदारानी दिलेल्या वृत्तानुसार घारेगाव एकतूनी, फारोळा , पांढरी पिंपळगाव, पिंपरी राजा, आडगाव खुर्द या गावांमध्ये भूकंपाचे सौम्ये धक्के जाणवले तर पैठण तालुक्यांत पाचोड ,विहामांडवा येथे सुद्धा धक्के जाणवल्याची माहिती  तहसीलदारानी कळविली आहे. सर्व तलाठी व मंडळ अधिकारी गावातून माहिती घेत आहेत.

Web Title: Big news! Epicenter of earthquakes in Hingoli, mild tremors in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.