मोठी बातमी! हर्षवर्धन जाधव यांचा के. चंद्रशेखर राव यांच्या BRS मध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 06:10 PM2023-03-23T18:10:09+5:302023-03-23T18:11:19+5:30

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ( उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठिंबा जाहीर केला होता.

Big news! Harshvardhan Jadhav joins CM K. Chandrashekhar Rao's BRS party | मोठी बातमी! हर्षवर्धन जाधव यांचा के. चंद्रशेखर राव यांच्या BRS मध्ये प्रवेश

मोठी बातमी! हर्षवर्धन जाधव यांचा के. चंद्रशेखर राव यांच्या BRS मध्ये प्रवेश

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर आज सकाळी जाहीर केले. मागील लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी घेतलेल्या मतांनी उलटफेर घडत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव होते एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव यांचा नव्या पक्षातील प्रवेश उत्सुकता वाढवणारा आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी पक्ष बीआरएसने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतर राव यांनी पक्षवाढीसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले होते. आजीमाजी खासदार, आमदारांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण पक्षप्रमुखांनी दिले आहे. मागील आठवड्यातच शहरात आयोजित सोहळ्यात अनेकांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. सोशल मीडियात एका व्हिडिओच्या माध्यमातून जाधव यांनी पक्ष प्रवेश केल्याचे जाहीर केले. तेलंगणात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. हा बदल करण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ता घेणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाकडे देण्यात यावी. यासाठी काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार असल्याची माहिती आहे. या सभेत देखील अनेकजण बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

हर्षवर्धन जाधव कायम चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व
कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव, खाजगी आयुष्यातील चढउतार यामुळे जाधव सक्रीय राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वीच जाधव यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ( उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठिंबा जाहीर केला होता. माझ्या पाठींब्यावर खैरे पुढील खासदार असतील असेही ते म्हणाले होते. दरम्यान, जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत रंगत वाढणार आहे. 

Web Title: Big news! Harshvardhan Jadhav joins CM K. Chandrashekhar Rao's BRS party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.