मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये EDच्या धाडी

By राम शिनगारे | Published: March 17, 2023 11:31 AM2023-03-17T11:31:01+5:302023-03-17T11:33:03+5:30

या घोटाळ्यात तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

big news! in Chhatrapati Sambhajinagar ED raid in the chase of PM Aawas Scheme fraud | मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये EDच्या धाडी

मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये EDच्या धाडी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला उघडकीस आला होता.  या प्रकरणात एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे पुढे आल्याने तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  होता. आता याप्रकरणी शहरात तीन ठिकाणी आज सकाळी ईडीने छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे.

मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेचा बारकाईने अभ्यास केल्यावर त्यांना यात गडबड आढळून आली. तपासात ही निविदा सिंगल आयपी ॲड्रेसवरून भरली असल्याचे उघडकीस आले. एकदच लॅपटॉपवरून ही निविदा चारही कंपन्यांनी अपलोड केल्याचे समोर आले. हा संपूर्ण टेंडर घोटाळा उघडकीस येताच गुरुवारी रात्री मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा ई-निविदेत फसवणूक करणाऱ्या समरथ कंपनीसह तीन कंपन्यांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर याचे कागदपत्रे ईडीने मागितली होती. दरम्यान, आज  शहरातील या निविदेच्या संदर्भात दोन उद्योजकांच्या तीन ठिकाणी ईडीने छापा टाकला. बिल्डर अमर अशोक बाफना यांच्या अहिंसा नगर येथे तर सतीश भागचंद्र रुणवाल यांच्या नवाबपुरा - पानदरीबा भागात ईडीच्या पथकांची कारवाई सुरु आहे. 

असा झाला घोटाळा 
या याेजनेच्या कामासाठी निविदा भरताना तीन कंत्राटदारांनी रिंग केल्याचे उघडकीस आले आहे. एकाच लॅपटॉपच्या आयपी ॲड्रेसवरून निविदा भरण्यात आल्याचे समजताच महापालिका प्रशासनाने सिटीचौक पोलिस ठाणे गाठले. समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या भागीदारांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या कंत्राटदारांनी महापालिकेच्या निविदा प्रक्रियेचा भंग केला, तसेच आर्थिक कुवत नसताना पालिकेची फसवणूक केली. त्यामुळे पालिकेचा घरकुल प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

आवास योजनेचा आजवरचा प्रवास...
समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्राॅपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. ४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सूल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. ३१ मार्च २०२२ पूर्वी तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी निविदा अंतिम करून त्यास राज्य सरकारची मंजुरी घेत केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला. केंद्र सरकारच्या समितीने ३० मार्च २२ रोजी घरकुल प्रकल्पाला मान्यता दिली होती; परंतु समरथ कन्स्ट्रक्शनने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थता दर्शविली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर समरथ कंपनीने पडेगाव येथील घरकुल प्रकल्पासाठी बँक गॅरंटी भरली. चारपैकी एक कंपनी अपात्र ठरली होती.

Web Title: big news! in Chhatrapati Sambhajinagar ED raid in the chase of PM Aawas Scheme fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.