मोठी बातमी! विशाल एंटरप्रायजेसने घाटी रुग्णालयासही पुरविली बनावट औषधी

By संतोष हिरेमठ | Updated: December 26, 2024 15:16 IST2024-12-26T15:15:22+5:302024-12-26T15:16:40+5:30

औषध प्रशासनाने मार्चमध्ये अँटिबायोटिकचे औषधीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते; ते बोगस असल्याचे स्पष्ट झाले

Big news! Vishal Enterprises supplied fake medicines to Chhatrapati Sambhajinagar's Ghati Hospital | मोठी बातमी! विशाल एंटरप्रायजेसने घाटी रुग्णालयासही पुरविली बनावट औषधी

मोठी बातमी! विशाल एंटरप्रायजेसने घाटी रुग्णालयासही पुरविली बनावट औषधी

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात विशाल एंटरप्रायजेसने बनावट औषधी पुरवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

औषध प्रशासनाने मार्चमध्ये अँटिबायोटिकचे औषधीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातून सदर अँटिबायोटिक बनावट असल्याचे समोर आले आहे. ही औषधी विशाल एंटरप्रायजेसनेच पुरविल्याची माहिती औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

अंबाजोगाईतील रुग्णालयास बनावट औषधी पुरवठा केल्याचे समोर आल्यानंतर घाटीतही विशाल एटंरप्रायजेसने ३३ प्रकारची औषधी पुरविल्याचे समोर आले. या औषधींचा वापर तात्काळ थांबविण्यात आला. या औषधींची नमुने तपासणीसाठी घेण्यात आली. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Big news! Vishal Enterprises supplied fake medicines to Chhatrapati Sambhajinagar's Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.