भाविकांना मोठा दिलासा, महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादहून वेरूळसाठी ३० सिटीबसचे नियोजन

By मुजीब देवणीकर | Published: February 17, 2023 02:48 PM2023-02-17T14:48:42+5:302023-02-17T14:48:51+5:30

मध्यवर्ती बसस्थानक ते वेरुळ दर पाच मिनिटाला बस उपलब्ध असेल

Big relief to devotees, planning of 30 city buses from Aurangabad to Verul on the occasion of Mahashivratri | भाविकांना मोठा दिलासा, महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादहून वेरूळसाठी ३० सिटीबसचे नियोजन

भाविकांना मोठा दिलासा, महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादहून वेरूळसाठी ३० सिटीबसचे नियोजन

googlenewsNext

औरंगाबाद:महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी वेरूळ येथील ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. औरंगाबादहून देखील अनेक भक्त दर्शनासाठी वेरूळला जातात. येथील भाविकांच्या सोयीसाठी स्मार्ट सिटीबसतर्फे ३० बसेस उद्या औरंगाबाद ते घृष्णेश्वर धावणार आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळसाठी औरंगाबाद स्मार्ट शहरबस विभागातर्फे ३० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या बस सिडको, टीव्ही सेंटर, हर्सूल टी पॉइंट, हडको कॉर्नर, रेल्वे स्टेशन येथून उपलब्ध असणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानक ते वेरुळ दर पाच मिनिटाला बस उपलब्ध असणार आहेत. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Big relief to devotees, planning of 30 city buses from Aurangabad to Verul on the occasion of Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.