‘मॅट’चा मोठा दिलासा; बेपत्ता व्यक्तीच्या पत्नीस कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचे आदेश
By प्रभुदास पाटोळे | Published: October 23, 2023 03:43 PM2023-10-23T15:43:13+5:302023-10-23T15:43:39+5:30
महसूल विभागातून निवृत्त कर्मचारी अचानक बेपत्ता झाला
छत्रपती संभाजीनगर : निवृत्त चंद्रभान खंबाट यांना महसूल विभागातून निवृत्ती वेतन मिळते. बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या पत्नीस व्याजासह कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचे आदेश ‘मॅट’चे उपाध्यक्ष न्या. पी. आर. बोरा यांनी दिले आहेत.
खंबाट हे २०१८ मध्ये अचानक बेपत्ता झाले. नातेवाइकांनी शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. पोलिस ठाण्यात खंबाट बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. खंबाट यांच्या पत्नी मंदाबाई यांनी महसूल विभागाकडे विनंती अर्ज देऊन कुटुंब निवृत्ती वेतन देण्यासंबंधी विनंती केली होती. संबंधित विभागाकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही. याविरोधात त्यांनी ॲड. अनंत डी. गाडेकर यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात मूळ अर्ज दाखल केला होता. ‘मॅट’ने कुटुंब निवृत्ती वेतन व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले.