पोलिसांच्या पहाऱ्यानंतरही दुचाकी चोरी थांबेना
By | Published: December 2, 2020 04:08 AM2020-12-02T04:08:48+5:302020-12-02T04:08:48+5:30
शहराच्या सेव्हन हिल उड्डाणपूल, एस.बी.ओ.ए. शाळेसमोर, एनआरबी कंपनीसमोर आणि सिग्मा हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळील ...
शहराच्या सेव्हन हिल उड्डाणपूल, एस.बी.ओ.ए. शाळेसमोर, एनआरबी कंपनीसमोर आणि सिग्मा हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळील कुबेर ॲव्हेन्यू इमारतीमधील कुबेर ॲडव्हर्टायझिंगसमोर उभी केलेली शाईन मोटारसायकल (एमएच २०- ईबी- १२२८) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. रामेश्वर प्रकाशअप्पा सराटे यांच्या तक्रारीनुसार जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत श्रीरंगराव साळवे कुटुंबासह बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. जाताना त्यांनी मोटारसायकल जोशना अपार्टमेंट, एसबीओ शाळेसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास काशीनाथ जाधव हा विद्यार्थी ३ नोव्हेंबर रोजी रात्री रांजणगाव फाट्याकडून साताऱ्याकडे निघाला होता. वाटेत मित्राचा फोन आल्यामुळे तो एनआरबी कंपनीसमोर थांबला. तेव्हा दोन अनोळखी तरुण आले व अचानक एकाने त्याची मोटारसायकल (एमएच २०- सीडी- ६०६५) व मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी किशोर रामचंद्र इंगळे यांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता आपली मोटारसायकल (एमएच २०- ईआर- २००३) सिग्मा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी करून ते दवाखान्यात रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजता ते बाहेर आले तेव्हा मोटारसायकल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.