बजाजनगरातून दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:02 AM2021-05-26T04:02:01+5:302021-05-26T04:02:01+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक रज्जाक शेख ...
वाळूज महानगर : बजाजनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक रज्जाक शेख (रा.बेगमपुरा) यांनी १७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.२०, सी.ए.९८१९) बजाजनगरातील एसबीआय बँकेसमोर उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली.
-------------------------
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे मोहीम
वाळूज महानगर : कोरोनाच्या काळात शैक्षणिक शुल्क व फी वसूल करण्यात येऊ नये, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे ‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या काळात शैक्षणिक शुल्क व फीस माफ करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येत असून शुल्क वसूल करणाऱ्या संस्थेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिला आहे.
----------------------
पंढरपुरात धूर फवारणी
वाळूज महानगर : पंढरपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी गावात धूर फवारणी करण्यात आली. आता पावसाळा तोंडावर आला असून साथीचे आजार बळावण्याची शक्यता असल्यामुळे सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा शेख, ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे व सदस्यांनी गावात धूर फवारणी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी संपूर्ण गावात धूर फवारणी करुन नागरिकांत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
---------------------------
लांझी गावात एकास मारहाण
वाळूज महानगर : किरकोळ कारणावरुन तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप बाबासाहेब कोळसे (३२, रा.लांझी) यास रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दिलीप पल्हाटे व त्याच्या सोबत असलेल्या महिलेने तू नमुना नंबर ८ अ चा उतारा गणेश वाघ यास का दिला, या कारणावरुन वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------
शासकीय रुग्णालयात अन्नदान
वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर परिसरातील सुमन फाउंडेशन, भीम योद्धा प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शासकीय रुग्णालयातील रुग्ण व गरिबांना अन्नदान करण्यात आले. प्रवीण नितनवरे, संतोष लाठे, सुखदेव सोनवणे,प्रकाश निकम, रमेश दाभाडे, अशोक वाहुळ, अशोक सुखधान, सूर्यकांत पठारग, विजय सोनवणे, भगवान बनकर, संतोष जाधव, प्रवीण तुपे, राम यादव, राहुल जोगदंड आदींच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
-------------------------