Bindhast Kavya: याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:57 PM2022-09-26T13:57:25+5:302022-09-26T14:41:42+5:30

Bindhast Kavya: १६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली.

Bindhast Kavya: It was for this that speculation was made, the fabrication of bindhast kavya youtuber missing case from aurangabad | Bindhast Kavya: याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस

Bindhast Kavya: याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस

googlenewsNext

औरंगाबाद - शहरातील प्रसिद्ध यू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ ही अल्पवयीन युवती याच महिन्यात १० सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता झाली होती. रागाच्या भरात निघून गेलेल्या काव्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने काही तासांत शोधण्यात शहर पोलिसांना यश आले. खुशीनगर एक्स्प्रेसमधून तिला ताब्यात घेत मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. त्यानंतर तिला औरंगाबाद शहरात आणले. मात्र, आता या घटनेबाबत वेगळीच माहिती समोर आली असून काव्याने ठरवूनच हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. 

१६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा मोबाईल देखील घरीच होता. यासंबंधी छावणी पोलिसांत मिसिंगची तक्रार आई वडिलांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता सरांनी माहिती घेऊन तात्काळ भोपाळ पोलिसांशी संपर्क साधला. अखेर काही तासांत तिला शोधण्यात यश आले. इटारसी रेल्वे स्टेशनवर काव्या आढळून आली होती. मात्र, आता या मिसींग प्रकरणात काहीही तथ्य नसून हे काव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेला बनाव असल्याचे खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अ‌ॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे.

काव्याची मिसिंग तक्रार नोंदवल्यानंतर 'आमची मदत करा. काव्याला सर्व जण ओळखतात. तिचा मोबाईल पण आमच्याजवळ आहे. तिच्याकडे केवळ दोनच हजार रुपये आहेत. शुक्रवारी दुपारीपासून काव्या घरी परतली नाही. तिच्याबद्दल माहिती मिळाली तर आम्हाला छावणी पोलिसांना कळवा.', अशी आर्जव करणारा व्हिडीओ बिनधास्त काव्याच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध युट्युबर शेअर केला होता. मात्र, आता हा सगळाच प्रकार बनाव असल्याचे उघडकीस आले आहे. 

दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना या पोरीनं आणि तिच्या कुटुंबीयांकडून वेठीस धरलं गेलं. हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होतं. नागरिकांना भावनाविवश करून लाइक करण्यास भाग पाडलं गेलं. प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, या फॅन फॉलोवर्स वाढविण्यासाठी अवलंबलेल्या चुकीच्या मार्गामुळे काव्याच्या पालकांविरुद्ध गुन्हाही दाखल होऊ शकतो. 

यू-ट्युबवर ५ मिलिअन फॉलोअर्स-

यू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ तिच्या नटखट स्वभावामुळे सोशल मीडियावर परिचित आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रिल्स चांगलेच लोकप्रिय आहेत. तिचे यू-ट्युबवर साडेचार मिलियनपेक्षा जास्त, तर इन्स्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स आहेत. याच चॅनलवरून तिच्या पालकांनी मुलीला शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करत चार तासांचा व्हिडिओ केला. ती यूट्युबवर, खेड्यातील एक दिवस, चुलीवरचं जेवण, कॉलेजमधला पहिला दिवस किंवा पर्यटक म्हणून विविध शहरांमध्ये फिरताना, असे निरनिराळे व्हिडीओ अपलोड करत असते. 
 

Web Title: Bindhast Kavya: It was for this that speculation was made, the fabrication of bindhast kavya youtuber missing case from aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.