औरंगाबादेत कचऱ्यातून ‘बायोगॅस’चे मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:06 AM2018-04-23T00:06:58+5:302018-04-23T00:08:01+5:30
शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीवर अद्याप शंभर टक्के उपाय सापडलेला नाही. त्यामुळे कच-यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. यावर विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात रविवारी मंथन करण्यात आले. इंदोर येथील संस्थेने ९० कोटी रुपयांचा डीपीआर कचरा प्रक्रियेसाठी मनपाला तयार करून दिला आहे. त्या संस्थेच्या तज्ज्ञ सदस्यांशी आज बायोगॅस निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीवर अद्याप शंभर टक्के उपाय सापडलेला नाही. त्यामुळे कच-यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. यावर विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात रविवारी मंथन करण्यात आले. इंदोर येथील संस्थेने ९० कोटी रुपयांचा डीपीआर कचरा प्रक्रियेसाठी मनपाला तयार करून दिला आहे. त्या संस्थेच्या तज्ज्ञ सदस्यांशी आज बायोगॅस निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.
विभागीय आयुक्तालयात कचºयासंबंधी आज आढावा बैठक झाली. बैठकीत कचºयावर प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांबाबत तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच शहरात साचलेला कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त वाहनांची व्यवस्था करण्याचे आदेशदेखील दिले. इंदोर येथून आलेल्या तज्ज्ञांसोबत बायोगॅस प्लँट आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा करताना आगामी काळात औरंगाबादेत कचºयापासून बायोगॅस निर्मिती होईल काय, यावर मंथन झाले.
या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, उपायुक्त हेमंत कोल्हे, उपअभियंता ए. बी. देशमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांची उपस्थिती होती. पालिकेने आज शहरातील विविध ठिकाणचा कचरा उचलला. शहागंजमधील १६ टन कचरा उचलण्यात आला. तसेच गांधीनगर भागातून पाच टन कचरा उचलला. याशिवाय टाऊन हॉल येथे सुका कचरा साठविण्यात आला होता. यापैकी ५ टन कचरा बेलिंगसाठी पाठविण्यात आला.
प्रभाग क्र. ६ येथून दोन टन सुका कचरा एका कंपनीला पाठविण्यात आला. तसेच प्रभाग क्र. ७ येथील तयार १४ टन खत शेतकºयांना वाटप करण्यात आल्याचे मनपा अधिकाºयांनी बैठकीत सांगितले.
जागा अतिक्रमित नाहीत ना ते पाहा
कचरा प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या जागा अतिक्रमित आहेत काय? याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले. चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, रमानगर या भागांतील जागांवर कोणत्या प्रकारचे आरक्षण आहे का, या जागांचे क्षेत्रफळ किती आहे, याबाबत आढावा घेऊन कम्पोस्टिंग पीटस्चे ठिकाण आणि क्षेत्र याबाबत तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.
टाऊन हॉलमधील कचरा उचलला
ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये मनपाच्या वॉर्ड अधिकाºयांनी सुका कचरा लपवून ठेवला होता. मनपाची ही लपवाछपवी उघड होताच रविवारी तातडीने कचरा उचलण्यात आला. टाऊन हॉलमध्ये तब्बल दहा टन कचरा साठवून ठेवण्यात आला होता. हा कचरा लिंबेजळगाव येथील एका जिनिंगमध्ये पाठविण्यात आला. तेथे सुक्या कचºयाच्या गाठी तयार करण्यात येणार आहेत. शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून वॉर्ड अधिकाºयांना वारंवार कचरा उचलावा, अशी तंबी देण्यात होती. उचलण्यात आलेला सुका कचरा नेमका ठेवायचा कुठे असा प्रश्न पडला.
चतुर अधिका-यांनीही कोणताच विचार न करता टाऊन हॉलला डम्पिंग यार्ड बनवून टाकले. दररोज जमा होणारा कचरा येथे गुपचूप आणून ठेवण्यात येत होता. तब्बल दोन महिन्यांनंतर याचे बिंग फुटले. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांकडून ओरड सुरू झाली. सुमारे १० टन कचरा साठविण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशावरून रविवारी वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी हा कचरा उचलला. टाऊन हॉलमधील कचरा ट्रकमध्ये भरून इतरत्र नेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
हा कचरा लिंबेजळगाव येथे जिनिंगमध्ये गाठी तयार करण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मनपाच्या अधिकाºयांनी दिली. महापालिकेच्या अनेक इमारतींमध्ये अशा पद्धतीने कचरा साठवून ठेवण्यात आला आहे. या मुद्यावर वॉर्ड अधिकारी, सफाई मजूर तोंड उघडायला तयार नाहीत. सिडको एन-७ भागातील मनपाच्या इमारतीतही शेकडो टन कचरा पडून आहे. आता महापौरांच्या आदेशानुसार दोन दिवसांपासून पुन्हा कचरा उचलण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जमा करण्यात आलेला कचरा अशाच पद्धतीने कोठेही साठवून ठेवण्यात येत आहे.