विद्यीपीठात संशोधक विद्यार्थी, कर्मचाऱ्यां पाठोपाठ प्राध्यापकांनाही बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य
By योगेश पायघन | Published: January 11, 2023 12:10 PM2023-01-11T12:10:51+5:302023-01-11T12:11:30+5:30
यासंदर्भात विद्यापीठाच्या अस्थापना विभागाने सोमवारी यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले
औरंगाबाद -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख व प्राध्यापकांना दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविणे अनिवार्य करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला. संशोधक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना यापूर्वीच बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या अस्थापना विभागाने सोमवारी यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.
विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांनी दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच नोंदवावी. यामध्ये रजा या विद्यापीठाने अंमलबजावणी केलेल्या ऑनलाइन लिव्ह मॅनेजमेंट सिस्टिम, फाइल ट्रेकिंग सिस्टिमद्वारेच विभाग प्रमुखांमार्फत सादर कराव्यात. रजा सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केल्याशिवाय रजेवर जाऊ नये व रजेवर जाताना वरिष्ठांनी आदेशित केलेले अधिकारी, कर्मचारी यांना आपला कार्यभार सुपूर्द करावा. ज्यांच्याकडे यूजर आयडी, पासवर्ड उपलब्ध नसेल त्यांनी युनिक विभागाशी संपर्क साधून तो प्राप्त करून घ्यावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.