पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवले पाच ठिकाणी पाणी; पक्षी बचाव अभियांतर्गत उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:38 PM2018-05-03T13:38:27+5:302018-05-03T13:40:47+5:30
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे शहरातील पाच प्रमुख ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली.
औरंगाबाद : कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे शहरातील पाच प्रमुख ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. झाडांवर पाण्याने भरलेले पाण्याचे भांडे टांगण्यात आले व माणसांना त्यात पाणी भरण्याचीही जबाबदारी सोपविण्यात आली.
पहिल्यांदा कॉ.चंद्रगुप्त चौधरी भवनाच्या टेरेसवर डांगे यांच्या हस्ते व ज्येष्ठ गुणवंत कामगार उत्तम आसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्र. ज. निकम गुरुजी यांच्या हस्ते चौधरी भवन परिसरातील झाडावर पाण्याचे भांडे टांगण्यात आले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी रमेश धनेगावकर, निर्मला बडवे, सुषमा जोशी, शारदा जाधव, राजेंद्र अजमेरा, रमेश तारापुरे, जी. ए. बारस्कर, चंद्रकांत पोतदार, कुलदी गुरव आदींची उपस्थिती होती.
सिडको बसस्थानकाजवळील वसंतराव नाईक यांचा पुतळ परिसरातील झाडांवरही पाण्याचे भांडे टांगण्यात आले. यावेळी जगन्नाथ काकडे, डॉ. बी. पी. रेघे, महेश सेवलीकर, सानिका आसबे, मुकुंद कोकणे, संतोष पापडीवाल, विश्वनाथ जांभळे, संजय झट्टू, मच्छिंद्र फुलावरे, पंडितराव तुपे, भीमसिंग शिरे, शिवराज पटणे, उत्तमसिंग दुल्हत आदींची उपस्थिती होती. मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे येत्या ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून पक्षी बचाव अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. आणखी पाच ठिकाणी झाडांवर पाण्याचे भांडे टांगण्यात येणार आहे.
मुकुंदवाडी स्मशानभूमीत...
मुकुंदवाडी स्मशानभूमीतील झाडांवर पाण्याचे भांडे टांगून तेथील स्मशानजोगी गायकवाड यांच्यावर देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली.
पोलिसांचा सहभाग....
मुकुंदवाडी पोलीस ठाणे परिसरातील झाडांवर पाण्याचे भांडे टांगताना पोलिसांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. यावेळी पोलीस कर्मचारी डॉ. राहुल खटावकर, संजय बहिरव, रवींद्र शिरसाट, गोकुळ जाधव, मधुकर मोरे, माधुरी खरात, सपकाळे, व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजर्षी शाहू विद्यालय परिसरातील झाडांवर संस्थाचालक आबा बिराजदार, मुख्याध्यापक मुंगळे, वाल्मीक सुराशे, संतोष माळकर, दिलीप आसबे, धनवटे, सुरेश कोकाटे, अभिजित आसबे, दौलत चौधरी आदींची उपस्थिती होती.