मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणारे भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 03:23 PM2020-12-12T15:23:41+5:302020-12-12T15:28:05+5:30
योजनेसाठी महापालिकेला द्यावी लागणारी रक्कम राज्य शासनाने द्यावी
औरंगाबाद : नवीन जलवाहिनीसाठी महापालिका देणार असलेल्या निधीसंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेतले. सर्वांना सिडको पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे. येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला आहे.
महापालिकेला नवीन जलवाहिनीसाठी ६३१ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम राज्य शासनाने भरावी यासाठी मागच्या सरकारच्या काळात प्रयत्न करण्यात आले. मात्र यावर निर्णय न घेता योजनेचे उद्धाघाटन करण्यात येत आहे. यामुळे ही रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. ही रक्कम राज्य शासनाने द्यावी या मागणीचे निवेदन देण्यास भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर बापू घडामोडे, कुणाल मराठे, शिवाजी लांडगे, राजा वानखडे, मनीषा भन्साळी , पुष्पा सोनावणे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी जात होते. पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोण्या आधीच ताब्यात घेतले. यानंतर सर्वांना सिडको पोलीस स्थानकात आणण्यात आले. यावेळी संयज केणेकर यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण असूनही ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. सर्वांनी सिडको पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या देत राज्य शासनाचा निषेध केला.