सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांना भाजपचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:32+5:302021-09-24T04:04:32+5:30
सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पायाभूत सुविधा देखील रुग्णांना उपलब्ध होत नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. रुग्णालय प्रशासनाकडे तीन रुग्णवाहिका असून ...
सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पायाभूत सुविधा देखील रुग्णांना उपलब्ध होत नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. रुग्णालय प्रशासनाकडे तीन रुग्णवाहिका असून देखील तासंतास ताटकळत बसावे लागते. अस्थिरोग विभाग बंद असल्याने रुग्णांना औरंगाबादला पाठविले जाते. रुग्णालय परिसरात सर्वत्र दुर्गंधी आणि कचरा साचला आहे. यामुळे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक अमित सरदेसाई यांना घेराव घातला. गांधीगिरी करीत त्यांना खेळण्यातील रुग्णवाहिका भेट देण्यात आली. ही परिस्थिती त्वरित न बदलल्यास भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी माजी आ. सांडू पा. लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, अशोक गरुड, दिलीप दाणेकर, जि. प. सदस्य गजानन राऊत, गणेश बनकर, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, विनोद मंडलेचा, नगरसेवक मनोज मोरेल्लू, दादाराव आळणे, संजय डमाळे, विष्णू काटकर, मधुकर राऊत, प्रकाश भोजवणी, प्रशांत चिनके आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
फोटो :
230921\img_20210923_171101.jpg
क्याप्शन
सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक अमित सरदेसाई यांना भाजपतर्फे घेराव घालण्यात आला.गांधीगिरी करत खेळण्यातील अंबुलन्स भेट दिली.यावेळी भाजप पदाधिकारी दिसत आहे.