भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 12:30 AM2017-02-24T00:30:20+5:302017-02-24T00:32:44+5:30

जालना : जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी २२ गटांवर तर पंचायत समितीच्या ११२ ंपैकी ५४ गणांवर विजय मिळवित भाजप जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

BJP is the biggest party | भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष

भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष

googlenewsNext

जालना : जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी २२ गटांवर तर पंचायत समितीच्या ११२ ंपैकी ५४ गणांवर विजय मिळवित भाजप जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने जागा खेचून आणलेल्या आहेत.
यंदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी गटातटात विभागल्याने आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे निकालावरून दिसून येते. निवडणूक प्रचारात आरोपांच्या फैरी झडल्याने प्रचारात रंगत आली होती. स्वबळावर लढत असल्याने अनेक महत्वपूर्ण गट व गणांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. जय-पराजय हा राजकारणाचा अविभाज्य भाग असला तरी निसटता पराभव काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या त्या पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रान पेटविले होते. अनेक कार्यकर्त्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अवघ्या जिल्हावासियांचे या निवडणुकीकडे आणि निकालाकडे लक्ष लागून होते. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. दुपारी पाच वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. यात भाजपाने २२ जागा पटकावत आता आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले. तर सेनेनेही १३ जागा मिळवत गड राखले. राष्ट्रवादीनेही पूर्वीचे संख्याबळ कायम ठेवले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या.

Web Title: BJP is the biggest party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.