भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:20 AM2017-08-27T00:20:21+5:302017-08-27T00:20:21+5:30
काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़ अगोदर काँग्रेसने आमचा वापर केला अन् आता भाजपाही तेच करीत आहे़ त्यामुळे घटनेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अमित भूईगळ यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़ अगोदर काँग्रेसने आमचा वापर केला अन् आता भाजपाही तेच करीत आहे़ त्यामुळे घटनेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अमित भूईगळ यांनी केले़
आगामी मनपा निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी ते शनिवारी नांदेडात आले होते़ भूईगळ म्हणाले, देशात आणि राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीवादी सरकार आहे़ त्यांच्याकडून दलित समाजावर अत्याचाराची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत उघडकीस आली आहेत़ देशाची घटना बदलण्याची भाषाही त्यांच्याकडून करण्यात येते़ त्यांच्या या विचारधारेच्या विरोधात अॅड़ बाळासाहेब आंबेडकर हे एकटे लढा देत आहेत़ सर्व समाजाने अॅड़बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे़ संविधानावर हा देश चालतो, परंतु आरक्षणातून मिळणाºया पदोन्नत्यावर सरकारच्या नाकर्तेपणामुळे गदा आली आहे़ त्यामुळे पुढील काळात आरक्षण बचाव आंदोलन उभे करण्यात येणार आहे़ मनपा निवडणुकीत भारिप संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे़ भारिपच्या जिल्हाध्यक्षपदावरुन सध्या सुरु असलेला वाद येत्या आठ दिवसांत सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले़