भाजपाचे नगरसेवक सहलीवर
By Admin | Published: May 20, 2017 12:40 AM2017-05-20T00:40:48+5:302017-05-20T00:42:35+5:30
लातूर : महापौर, उपमहापौर पदाची निवड २२ मे रोजी होणार असून, काठावर बहुमत असलेल्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : महापौर, उपमहापौर पदाची निवड २२ मे रोजी होणार असून, काठावर बहुमत असलेल्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठविले आहे. काँग्रेसने महापौर पदाच्या निवडीसाठी तगडा उमेदवार उभा केला आहे. परिणामी, या निवडीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्वच नगरसेवकांना सहलीवर पाठवून ही खबरदारी घेतली आहे.
लातूर मनपात भारतीय जनता पार्टीचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत, तर काँग्रेस पक्षाचे ३३ नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक आहे. भाजपाने महापौर व उपमहापौर पदासाठी चौघा जणांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही पदांसाठी ऐनवेळी तिघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार आहे. पक्षांतर्गत बंडखोरी होऊ नये तसेच घोडेबाजार झाला तर त्याला आपले नगरसेवक बळी पडू नयेत, ही सर्व खबरदारी भाजप पक्षनेतृत्वाने घेतली आहे. उमेदवारी अर्जावरून तसेच सहलीवरून हे स्पष्ट जाणवत आहे. मुंबई-मीरा भार्इंदर येथील रामभाऊ माळगी प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रात या नगरसेवकांना २० ते २१ मे पर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका ट्रॅव्हल्सद्वारे भाजपाचे सर्व नगरसेवक शुक्रवारी सकाळीच मुंबईला रवाना झाले आहेत.