भाजपची सत्तेसाठी लाचारी; पूर्वी ओरडणारे किरीट सोमय्या, चित्रा वाघ आता गप्प झालेतं
By संतोष हिरेमठ | Published: August 22, 2022 02:36 PM2022-08-22T14:36:27+5:302022-08-22T14:37:25+5:30
आदर्श ग्राम योजना ही बोगस योजना आहे. त्यात काहीही नियम नाही.
औरंगाबाद : सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स संस्थांचा दुरुपयोग होत आहे. हे देशासाठी घातक आहे. राज्यात जे मंत्री झाले, त्यांच्या नावाने ओरडणारे किरीट सोमय्या गप्प झाले आहे. चित्रा वाघही गप्प झाल्या आहेत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारली जात आहे, असा हल्लाबोल खा. इम्तियाज जलील यांनी केला.
पुढे बोलताना खा. जलील म्हणाले, नवीन बँक सुरू होण्याऐवजी बंद होत आहेत. महाराष्ट्रमध्ये रेल्वेसाठी काही तरी करा असे म्हणत खा. इम्तियाज जलील यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री डॉ. रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.
खासदार निधी देयचा तर पंतप्रधानांचे नाव का?
आदर्श ग्राम योजना ही बोगस योजना आहे. त्यात काहीही नियम नाही. केंद्राचे दोन मंत्री आमच्याकडे आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. खासदार निधीतून पैसे द्यायचे आहे तर, पंतप्रधान यांचे नाव कशासाठी लावायचे, असे खा. इम्तियाज जलील सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.