भाजपला ‘धस’का !

By Admin | Published: November 30, 2015 11:08 PM2015-11-30T23:08:17+5:302015-11-30T23:32:10+5:30

गणेश दळवी , आष्टी आष्टी मतदारसंघात भाजपला सतत धक्क्यांवर धक्के बसले आहेत. नगरपंचायतीच्या धक्क्यातून सावरत नाही तोच कडा कृउबा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला हादरा दिला.

BJP 'Dhas'! | भाजपला ‘धस’का !

भाजपला ‘धस’का !

googlenewsNext


गणेश दळवी , आष्टी
आष्टी मतदारसंघात भाजपला सतत धक्क्यांवर धक्के बसले आहेत. नगरपंचायतीच्या धक्क्यातून सावरत नाही तोच कडा कृउबा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला हादरा दिला. त्यामुळे भाजपने चांगलाच ‘धस’का घेतला असून, आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.
आष्टी मतदार संघाचे राजकारण गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून धोंडे आणि धस यांच्याच भोवती फिरत आहे. आजपर्यंत जो मतदार संघाचा आमदार होता त्याच्याच हाती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेच्या चाव्या हाती होत्या. आता मात्र राजकारणाची गणिते उलटे होऊ लागले आहेत. जो आमदार सत्ताधारी आहे त्याच्या विरूध्द स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल विरोधात जाऊ लागले आहेत.
धोंडेनी वर्षभराच्या कालावधीत मागे काय सुरु आहे हे पाहिलेच नाही. या संधीचा फायदा घेत माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी एक वर्षात आपल्या जुन्या खेळीची चाल सुरु करून नगर पंचायत निवडणुकीत पहिला डाव टाकला. या निवडणुकीत १७ जागे पैकी १४ जागेवर विजय मिळवत नगर पंचायत ताब्यात घेतली पाटोदा, शिरूर नगर पंचायत जिंकून आ.धोंडेना पहिला धक्का दिला. जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब आजबे व आ. धोंडे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्याचा फटकाही पक्षाला बसला.
जबाबदारी कोणाची ?
आष्टी मतदारसंघात नगर पंचायत, बाजार समिती या दोन्ही निवडणुकीत भाजपला पराभव पहावा लागला. भीमराव धोंडे हे आमदार आहेत तर बाळासाहेब आजबे हे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे पराभवाची जबाबदारी कोणाची ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: BJP 'Dhas'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.