मंठा बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:24 AM2017-09-30T00:24:33+5:302017-09-30T00:24:33+5:30
मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला धक्का देत वर्चस्व राखले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी संदीप भुजंगराव गोरे, तर उपसभापतीपदी राजेश नायबराव मोरे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला धक्का देत बाजार समितीवर वर्चस्व राखले आहे.
मंठा बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांच्या उपस्थितीत दुपारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात १३ विरूद्ध ५ अशा मताधिक्क्याने सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आली.
भाजपाकडून सभापती पदासाठी संदीप गोरे तर शिवसेनेकडून निलावती मोरे यांनी तर उपसभापती पदासाठी भाजपाकडून राजेश मोरे, शिवसेनेकडून प्रल्हाद बोराडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी दोन्ही पदांसाठी हात वर करून मतदान करण्यात आले.
यावेळी भाजपा १३ तर शिवसेनेला ५ असे मतदान झाले. यावेळी भुजंगराव गोरे, जि.प. सदस्य राहुल लोणीकर, शिवाजी खंदारे, अंकुश कदम, गणेश खवणे, प्रदीप बोराडे, संभाजी खंदारे, उद्धव गोंडगे, बाबूराव शहाणे, कैलास बोराडे, नरसिंग राठोड, निवास देशमुख, विठ्ठल काळे, सतीष निर्वळ, मुस्तफा पठाण, अंकुश कदम, नारायण काकडे, विलास घोडे, माऊली वायाळ, कल्याण खरात आदींची उपस्थिती होती.