जाफराबादमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादी-शिवसेना पडले फिके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:33 AM2017-10-10T00:33:49+5:302017-10-10T00:33:49+5:30

तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली.

 BJP in front of Jafarabad, NCP-Shiv Sena falls! | जाफराबादमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादी-शिवसेना पडले फिके!

जाफराबादमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादी-शिवसेना पडले फिके!

googlenewsNext

प्रकाश मिरगे
जाफराबाद : तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली. एवढेच नव्हे तर तो आमचाच उमेदवार म्हणत अनेकांनी सेल्फी काढत दावा सुरू केला आहे.
तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात लढत झाली. त्यामुळे शिवसेना तालुका अध्यक्ष बजरंग बोरसे यांनी राष्ट्रवादीने जिंकलेल्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही सोबत मिळून लढविल्या असून, त्यात आमचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार राजकारण करत इतर पक्षाचा टेकू घेत निवडणुका लढवून जिंकल्या असल्याने ते सगळीकडेच हात ठेवून आहेत. एक मात्र नक्की भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ घेतसुद्धा अपेक्षित यश मिळालेले नाही. काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असल्याने एका गटाला भाजपचे अधिकृत असताना पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरपंच पद एक आणि दावे अनेक असे चित्र रंगले.
खासगाव ग्रामपंचायतीमध्ये संतोष लोखंडे यांनी तालुक्यातून विक्रमी मताने निवडून येण्याचा बहुमान मिळविला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच घुमजाव केल्याने येथे राष्ट्रवादीने पक्षाचा विश्वासघात केला असल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे गावात राष्ट्रवादीचे काम मोठे हा नुसता गवगवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ठिकाणी एकतर्फी निवडणुक झाली.
प्रतिष्ठतेच्या समजल्या जाणाºया खासगाव आणि काळेगाव या ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य लिलाबाई लोखंडे व शालीकराम म्हस्के यांनी बहुमताने ताब्यात ठेवल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान कृषी सभापती जिजाबाई कळंबे यांची गारखेडा-टाकली ग्रामपंचायत भाजपाने ताब्यात घेतली.
भाजपाने चापणेर- धोंडखेडा, येवता, आसई, खासगाव, सवासनी, नळविहरा, मेरखेडा, सावरगाव म्हस्के, काळेगाव,डावरगाव देवी, गारखेडा-टाकळी, खानापूर-वरखेडा फिरंगी या ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने चापणेर-धोंडखेडा, येवता, माहोरा, आसई, घानखेडा, नळविहरा, डावरगाव देवी, तर शिवसेनेने रास्तळ वानखेडा यावर दावा सांगितला आहे. पंधरा ग्रामपंचायतीत नवीन सरपंच आणि त्यांचे सदस्य निवडून आल आहेत, असे असले तरी सगळ्यांनी मिळून दावा वीसचा केला आहे. त्यामुळे खरे चित्र काय हे लवकरच स्पष्ट होणार आहे. खानापूर ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाली आहे.
--------------------
ग्रामपंचायत निहाय सरंपच पुढील प्रमाणे
खासगाव- संतोष रामराव लोखंडे,
मेरखेडा- श्रीकृष्णा शालीकराम जाधव,
घानखेडा- सरस्वती राजू बोराडे,
रास्तळ- वानखेडा- शिवगंगा संतोष जाधव,
नळविहीरा- मिनाबाई रमेश गाडेकर,
सवासणी- रेखा समाधान गाडेकर,
आसई- अनिता विलास इंगळे,
माहोरा- वैशाली रविद्र कासोद,
येवता- अवचितराव महादु दळवी
काळेगाव- अन्नपुर्णा वसंतराव चव्हाण,
सावरगाव म्हस्के- दिनकर देवराव म्हस्के
गारखेडा-टाकळी - मनिषा गजानन कळंबे,
डावरगाव देवी- अनिल बळीराम नवले
चापनेर- धोंडखेडा - लताबाई विक्रम साळेकर,
खानापूर-वरखेडा फिरंगी- पंचफुला देविदास शेळके

Web Title:  BJP in front of Jafarabad, NCP-Shiv Sena falls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.