भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या स्वागताचे होर्डिंग बंजारा ब्रिगेडने फाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 06:30 PM2023-01-02T18:30:40+5:302023-01-02T18:36:01+5:30

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार असून, सभेला सहा विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपप्रेमी, नागरिक उपस्थित राहतील, अशा व्यवस्था केली आहे.

BJP President J.P. Naddas welcoming hoardings tore down by Banjara Brigade | भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या स्वागताचे होर्डिंग बंजारा ब्रिगेडने फाडले

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या स्वागताचे होर्डिंग बंजारा ब्रिगेडने फाडले

googlenewsNext

औरंगाबाद: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आज सायंकाळी होणाऱ्या सभेपूर्वी हायकोर्टासमोरील चौकात लावलेले स्वागताचे होर्डिंग बंजारा ब्रिगेडकडून फाडण्यात आले. या होर्डिंगमुळे संत सेवालाल महाराज चौकाचा नामकरणाचा फलक झाकला गेला होता, त्यामुळे बंजारा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज दुपारी होर्डिंग फाडल्याची माहिती आहे. 

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. याच एकभाग म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार आहे. भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे. सभेच्या तयारीसाठी अत्यंत कमी दिवसाचा कालावधी मिळाला असला तरी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने शहरात चांगली वातावरण निर्मिती केली आहे. शहरातील चौकाचौकात राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. जालना रोडवर देखील नड्डा यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागण्यात आले आहेत. दरम्यान, हायकोर्टासमोरील भाजपच्या सभेचे होर्डिंग हे संत सेवालाल महाराज चौकाच्या नामकरण फलकाच्या समोर लावण्यात आले होते. त्यामुळे तो फलक झाकला गेला. हा प्रकार निदर्शनास आल्याने बंजारा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ समोरील होर्डिंग फाडले. 

असा असेल नड्डांचा दौरा 
अध्यक्ष नड्डा २ जानेवारी रोजी घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यांच्या हस्ते वेरूळ येथील अहिल्यादेवी कुंडाच्या सौंदर्यीकरणाचा व साउंड व लाईट शोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तेथून ते सभेसाठी शहरात येतील. सभेनंतर वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तीन अशा सहा मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची ते बैठक घेतील. नंतर शहरातील महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करणार आहेत. 

शिवसेनेकडे असलेल्या जागांसाठी जोरदार तयारी 
महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं लोकसभा सदस्य असलेलं राज्य आहे. त्यामुळे, भाजपचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या १८ जागांसाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. देशात भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला आहे. त्याचे नियोजन म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुतीसाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे. 

Web Title: BJP President J.P. Naddas welcoming hoardings tore down by Banjara Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.