भाजप, सपा कार्यकर्ते शिवसेनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:06 AM2021-01-13T04:06:06+5:302021-01-13T04:06:06+5:30
पुंडलिकनगर रोडलगत खोदला खड्डा औरंगाबाद : पुंडलिकनगर रोडलगत मनपाने मोठा खड्डा खोदला आहे. त्यामुळे डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनांना उजवीकडे ...
पुंडलिकनगर रोडलगत खोदला खड्डा
औरंगाबाद : पुंडलिकनगर रोडलगत मनपाने मोठा खड्डा खोदला आहे. त्यामुळे डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळताना अडचण येत आहे. मागील एक आठवड्यापासून तो खड्डा तसाच आहे, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने तो खड्डा खोदला, तो तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.
आधार कार्ड एनपीसीआयला जोडण्याचे आवाहन
औरंगाबाद : महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक एनपीआयला मॅपद्वारे बँकेशी लिंक करून घेऊन शिष्यवृत्ती प्रोफाइल अद्ययावत करून घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे. सर्व प्रवर्गातील मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्याला जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असा इशाराही समाजकल्याण विभागाने दिला आहे.
महसूल वसुलीत औरंगाबाद पिछाडीवर
औरंगाबाद : महसूल वसुलीत औरंगाबाद जिल्हा सध्या पिछाडीवर आहे. जिल्ह्यात आजवर ४१ कोटी १५ लाख रुपयांचा महसूल वसूल झाला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने मार्चअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात कर संकलन उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. करवसुलीत जालना जिल्हा आघाडीवर आहे. ४९ टक्के म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या ४२ कोटींपर्यंत जिल्हा गेला आहे.
मृद व जलसंधारण, रोहयो कार्यशाळा आजपासून
औरंगाबाद : ‘मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आमची माणसे’ या विषयावर जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी येथे ११ आणि १२ जानेवारी दोनदिवसीय बुद्धिमंथन कार्यशाळेचे आयोजित केली आहे. सकाळी १० वा. मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे, पद्मश्री पोपटराव पवार, अपर मुख्य सचिव नंदकुमार, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मी महासंचालक मधुकर राजे अर्दड आणि मनरेगा आयुक्त शंतनू गोयल यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.