भाजपत प्रचंड त्रास; खडसे सोडून गेले तरी वरिष्ठांना काही समजेना
By सुमेध उघडे | Updated: November 18, 2020 19:31 IST2020-11-18T18:54:51+5:302020-11-18T19:31:02+5:30
हरलेल्या उमेदवारास पदवीधर कसे मतदान करतील

भाजपत प्रचंड त्रास; खडसे सोडून गेले तरी वरिष्ठांना काही समजेना
खुलताबाद : भाजपने मराठवाडा पदवीधर मतदार संघात गेल्या निवडणुकीत हरलेल्या उमेदवारालाच परत उभे केले आहे. हा उमेदवार वार्डात निवडून येऊ शकत नाही. अशा हरलेल्या उमेदवारास पदवीधर कसे मतदान करतील अशी टीका माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांनी केली. तसेच भाजपत प्रचंड त्रास आहे. खडसे पक्ष सोडून गेले तरी वरिष्ठांना काही कळत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला. ते खुलताबाद येथे पदवीधरांच्या मेळाव्यात बोलत होते.
माजी.खा. जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुण नुकतीच भाजपला सोडचिठी दिली. नाराज गायकवाड यांनी यानंतर राष्ट्रवादीचे उमदेवार सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे पदवीधरांच्या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे गायकवाड यांनी मेळाव्यात भाजपवर चौफेर टीका केली. गायकवाड म्हणाले, भाजपमध्ये केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे गेलो होतो. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली तरी वरिष्ठांना काही समजेना, तिथे प्रचंड त्रास आहे. या निवडणकीत भाजपला अशी चपराक द्या की वरिष्ठांचे पण डोके ठिकाणावर आले पाहिजे अशी टीका करत गायकवाड यांनी भाजपच्या उमेदवाराला चारीमुंड्या चित करायचे असल्याने मराठवाडा दौऱ्यावर निघालो आहे असेही सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अँड. कैसरोद्दीन, माजी सभापती महेश उबाळे, प्रा .गणी पटेल, राष्ट्रवादी कॉग्रेंसचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, शहराध्यक्ष मुजीबोद्दीन, शहर कार्याध्यक्ष रावसाहेब फुलारे, रायुकॉ तालुकाध्यक्ष आदीनाथ सांळुके, शहराध्यक्ष गजानन फुलारे, निसार पठाण, जिल्हाउपाध्यक्ष केशव जाधव, द्यानेश्वर दुधारे, अब्दूल अजीज, महमंद नईम, अब्दूल मजीद मणियार, पोपट बारगळ आदीसह मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते.