सिल्लोडमध्ये भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:46+5:302021-04-23T04:05:46+5:30
सिल्लोड : शहरासह तालुक्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची ...
सिल्लोड : शहरासह तालुक्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, आरोग्य सेवेसाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. रेमडेसिविरचाही काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी भाजपने गुरुवारी सिल्लोडमध्ये आंदोलन केले.
यात उपजिल्हा रुग्णालयात त्वरित व्हेंटिलेटर उपलब्ध करावे, शासकीय रुग्णालयात २४ तास कोविड तपासणी करावी, सर्व हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करताना मुबलक प्रमाणात औषधसाठा द्यावा, रुग्णांसाठी पूर्णवेळ रुग्णवाहिका असावी, शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची पत सुधारावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे कोषाध्यक्ष प्रकाश भोजवानी, राजू गायकवाड, नंदकुमार श्रीवास्तव, मधुकर जाधव, अतुल वाघ, योगेश साळवे, स्वप्नील शिंगारे, आदी उपस्थित होते.
--- कॅप्शन : सोयीसुविधांसाठी सिल्लोडमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
220421\img_20210422_184840_1.jpg
सिल्लोड