ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 PM2021-09-15T16:33:39+5:302021-09-15T16:35:35+5:30

OBC Reservation आ. अतुल सावे, शहरअध्यक्ष केणेकर घुगे व पदाधिकाऱ्यांना अटक

BJP's Chakkajam agitation for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणला

औरंगाबाद : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे जालना रोड वरील दुध डेअरी सिग्नल, अमरप्रीत चौकात आज सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूकीची कोंडी झाली होती. भाजप शहरअध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आ.अतुल सावे, प्रवीण घुगे, बस्वराज मंगरूळे, सविता कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में, सोनियाचा पोपट, काय म्हणतो, आरक्षण द्यायचं नाही म्हणतो, महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, आरक्षण आमच्या हाक्काचे नाही, कुणाच्या बापाचे, जो ओबीसी हित कि बात करेगा, वही महाराष्ट्र पे राज करेगा, या भ्रष्ट महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाची राजकीय हत्या झाली. सरकारनेच राजकीय आरक्षण घालविले. असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलन सुरू असताना पोलिस व आंदोलकांची झटापट झाली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून, क्रांतीचौक पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केले.

यावेळी भाऊराव देशमुख, राजु शिंदे, समीर राजुरकर, शिवाजी दांडगे, राजेश मेहता, अनिल मकरिये, गोविंद केंद्रे, जांलिदंर शेंडगे, डॉ.राम बुधवंत, अमृता पालोदकर, सागर पाले, प्रविण कुलकर्णी, अजय शिंदे, संजय चौधरी, लक्ष्मीकांत थेटे,रुण पालवे, शंकर म्हात्रे, मनोज भारस्कर, अशोक दामले, मनिषा मुंडे, मनिषा भनसाली, प्रमोद राठोड, रामेश्वर भादवे , दीपक ढाकणे, बालाजी मुंडे, संजय बोराडे, हाफिज शेख, जगदीश सिद्ध,अरविंद डोणगावकर, विवेक राठोड, रामचंद्र नरोटे, दौलत खान पठाण, धनंजय कुलकर्णी, दिव्या मराठे, संग्राम पवार, धंनजय पालोदकर, मोहन आघाव, चंद्रकांत हिवराळे, लक्ष्मण कुलकर्णी, ज्ञानेश्वर बोरसे, बालाजी मुंडे, नितिन चिते, सागर निलकंठ, कुणाल मराठे, विजय वडमारे, साधना सुरडकर, योगेश वाणी,पुजा सोनवणे आदींना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले.

हेही वाचा - जावयाचा प्रताप ! सासऱ्याकडून १० लाख उकळून पत्नीला दिले बनावट नियुक्तीपत्र

Web Title: BJP's Chakkajam agitation for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.